Tarek Fateh News: प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 06:31 PM2023-04-24T18:31:28+5:302023-04-24T19:54:48+5:30

Tarek Fateh News: तारेक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण ते स्वतःला नेहमी भारतीय म्हणायचे.

Tarek Fateh News: Renowned Journalist-Writer Tarek Fateh passed away, was ill for several days | Tarek Fateh News: प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Tarek Fateh News: प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

googlenewsNext

Tarek Fateh News: प्रसिद्ध पाकिस्तानीपत्रकार आणि लेखक तारेक फतेह(Tarek Fateh) यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी नताशा फतेह हिनेच ट्विटरवरुन त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. तारेक फतेह गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

तारेक फतेह यांच्या मुलीने तारेक यांचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबत ट्विट केले की, 'पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनेडाचा प्रियकर, सत्य बोलणारा, न्यायासाठी लढणारा, शोषित-वंचितांचा आवाज असलेले तारेक फतेह यांनी आपली मोहीम पुढे नेली आहे. त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत जिवंत राहील.' 

याआधी शुक्रवारीही तारेख यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासही सुरुवात केली. तारेक फतेह काही वेळातच ट्विटरवर ट्रेंड करू लागले. मात्र, तारेक यांच्या जवळच्या लोकांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. पण आज त्यांचे निधन झाले असून, स्वतः त्यांच्या मुलीनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

Web Title: Tarek Fateh News: Renowned Journalist-Writer Tarek Fateh passed away, was ill for several days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.