"टैरीफ का बदला टैरीफ...!" मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 10:02 IST2025-02-02T10:02:12+5:302025-02-02T10:02:57+5:30
डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे...

"टैरीफ का बदला टैरीफ...!" मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय
मॅक्सिकोने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफला टेरिफनेच युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना मॅक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबाम शनिवारी म्हणाल्या, "अमेरिकेने मॅक्सिकन वस्तूंवर टेरिफ (कर/शुल्क) लावल्यानंतर, आपण आपल्या अर्थमंत्र्यांना मॅक्सिकोच्या हिताच्यादृष्टीने टेरिफ आणि बिगर-टेरिफ उपायांन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. शीनबाम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट केली आहे. यात, आपल्या सरकारला अमेरिकेसोबत संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि संवाद अपेक्षित आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
डाव्या विचारसरणीच्या नेत्या क्लॉडिया शीनबाम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव वारंवार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोच्या राष्ट्रापती म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांच्या सरकारच्या आतापर्यंतच्या कामाची प्रशंसा केली. शीनबाम म्हणाल्या, "आपल्या कार्यकाळात घातक सिंथेटिक ओपिओइड फेंटेनाइलची 20 मिलियन खुराक जप्त करण्यात आली. तसेच, १,००,००० हून अधिक ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे."
चीनमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर 10 टक्के तर मॅक्सिकोच्या उत्पादनांवर 25 टक्के टेरीफ -
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मॅक्सिको आणि चीनविरोधात नव्या टेरिफ आदेशांवर स्वाक्षरी केली. त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर 10 टक्के आणि मॅक्सिकोकडून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टेरीफ लावण्यासाठी आर्थिक आणीबाणीची घोषणा केली. याच बरोबर, आपण कॅनडीयन वस्तूंवरही मोठे शुल्क लावण्यासंदर्भात अमल बजावणी करू. अमेरिकेत सिंथेटिक ओपिओइड फेंटानिलची तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवेश रोखण्यात शीनबॉम प्रशासन अपयशी ठरल्याने आपण मेक्सिकन वस्तूंवर टेरीफ लादण्याचा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या टेरिफ रेटची अंमलबजावणी 4 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.