टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:07 IST2025-04-08T10:06:18+5:302025-04-08T10:07:21+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे...

टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसे उत्तर द्यायचीही तयारी सुरू केली आहे. यातच, EU अर्थात युरोपियन युनियनने काही अमेरिकन वस्तूंवर काउंटर टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे वृत्त आहे. या प्रस्तावावर ९ एप्रिलला EU चे सदस्य देश मतदान करतील. हा प्रस्ताव स्वीकारला गेला, तर टॅरिफ १५ एप्रिलपासून प्रभावित होईल. मात्र अधिकांश शुल्क मे आणि डिसेंबरपासून वसूल केले जाईल.
या वस्तू महागणार -
रॉयटर्सने दस्तएवजांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही वस्तूंवर 16 मेपासून टॅरिफ लागू होईल. तर काही इतर वस्तूंवर याच वर्षापासून टॅरिफलागू होईल. यात, हीरे, अंडी, डेंटल फ्लॉस, पोल्ट्रीसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, काही सदस्य देशांनी आक्षेप घेतल्यानंतर या यादीतून काही वस्तू वगळण्यात आल्या आहेत. याशिवाय, बदाम आणि सोयाबीनवर डिसेंबरपासून टॅरिफ लादलेजाईल.
खरे तर, ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या मादक पेयांवर 200 टक्के काउंटर टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. यानंतर फ्रान्स आणि इटली सारख्या सदस्य देशांचे टेन्शन वाढले होते.
युरोपीय संघाने सोमवारी म्हटले आहे की, आपण ट्रेड युद्धापासून दूर राहण्यासाठी शून्य टॅरिफचा प्रस्ताव ठेवला आहे. ट्रम्प यांनी ईयूला स्टील आणि अॅल्युमिनियम तसेच कारवर 25 टक्के इम्पोर्ट टॅरिफ आणि 20 टक्के ब्रॉडर टॅरिफ लावला आहे.
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर -
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे. याला प्रत्युत्तर देत चीननेही अमेरिकन आयातीवर ३४ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. व्यापार युद्धाच्या भीतीमुळे शेअर बाजारांमध्ये सर्वत्र घसरण दिसून येत आहे. यामुळे अमेरिकेतही आर्थिक विकास मंदावण्याची भीती आहे व्यक्त केली जात आहे.