Mosquito Bite: डासामुळे आयुष्य उद्धवस्त; महिला कोमात गेली, तिचे दोन्ही हात-पायदेखील कापावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 05:15 PM2023-03-26T17:15:29+5:302023-03-26T17:16:15+5:30
Mosquito Bite: डास चावल्यामुळे महिलेचे आयुष्य उद्धवस्त झाले, जाणून घ्या नेमकं काय झालं..?
Mosquito Bite Tatiana Timon: आपल्याला दररोज किमान एकदा डास चावतो. डास चावणे मोठी गोष्ट नाही, पण हाच डास कधी-कधी मोठ्या आजाराचे कारण बनू शकतो. डास चावल्यामुळे ताप, चिकनगुनिया, डेंग्यू अशाप्रकारचे आजार होतात. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्याची वेळही येऊ शके. पण, डास चावल्यामुळे एका तरुणीला आपले हात-पाय गमवावे लागले आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरच घडलंय.
ही घटना एका ब्रिटिश महिला डान्सर तातियाना टिमनसोबत घडली आहे. या महिलेला डास चावल्यानंतर सौम्य ताप आली. कालांतराने या तापेचे रुपांतर मलेरियामध्ये झाले. मलेरिया बरा करण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथूनच तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत गेले. मलेरियाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्या महिला आणखीनच आजारी पडली.
उपचारादरम्यान तातियाना काही काळ कोमातही राहिली. शेवटी परिस्थिती इतकी बिटक झाली की, तिच्या शरीरात संसर्ग पसरला. हा संसर्ग वाढल्यानंतर तिचे दोन्ही पाय आणि हात कापावे लागले. एका डासामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कोविडच्या काळात तिला पहिल्यांदा हा आजार जाणवला होता. दोन्ही पाय गेल्यानंतर आता तिला कृत्रिम पाय बसवण्यात आले आहेत.