सौदी अरेबियात नागरिकांना भरावा लागणार 'TAX'

By admin | Published: January 31, 2017 06:16 PM2017-01-31T18:16:53+5:302017-01-31T18:31:40+5:30

मागच्या दोन वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमती कोसळत असल्याने लवकरच त्याचे चटके सौदी अरेबियात राहणा-या नागरीकांना सहन करावे लागणार आहेत.

'TAX' to be paid in Saudi Arabia | सौदी अरेबियात नागरिकांना भरावा लागणार 'TAX'

सौदी अरेबियात नागरिकांना भरावा लागणार 'TAX'

Next

 ऑनलाइन लोकमत 

रियाध, दि. 31 - मागच्या दोन वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमती कोसळत असल्याने लवकरच त्याचे चटके सौदी अरेबियात राहणा-या नागरीकांना सहन करावे लागणार आहेत. लवकरच सौदीमध्ये करमुक्त जीवन भूतकाळ होणार आहे. सौदीच्या मंत्रिमंडळाने सोमवारी नागरीकांकडून करवसुलीच्या निर्णयाला मान्यता दिली. 
 
तेल संपन्न सौदी अरेबियामध्ये राहणा-या नागरीकांना बरीच वर्ष करमुक्तता आणि विविध सवलती मिळाल्या. पण 2014 पासून कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण सुरु झाली आणि सौदीमध्ये कपात आणि महसूलाचे नवे मार्ग शोधण्यास सुरुवात झाली. सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असून, अरब देशांमध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. 
 
अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्यासाठी सौदी अरेबियाने मोठया प्रमाणावर खर्चात कपात केली आहे. 2020 पर्यंत अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सौदी आता तेलाव्यतिरिक्त अन्य उद्योगांना प्राधान्य देत आहे. 
 

Web Title: 'TAX' to be paid in Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.