नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:29 AM2020-07-17T11:29:12+5:302020-07-17T11:29:25+5:30

या भाग्यवान विजेत्यांच्या यादीमध्ये भारतीय महिलेचेही नाव आहे. भारतीय महिला दुबईच्या अजमान शहरात एका शाळेची मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

teacher luck online 1 million us dollars lucky draw dubai indian women school principal | नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

googlenewsNext

कोणाचं नशीब कधी फळफळेल काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेसोबत घडला आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या शिक्षिका महिलेला लकी ड्रामध्ये १ मिलियन अमेरिकी डॉलरची लॉटरी लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑनलाइन लकी ड्रॉमध्ये अनेक लोक सामील होतात. या भाग्यवान विजेत्यांच्या यादीमध्ये भारतीय महिलेचेही नाव आहे. भारतीय महिला दुबईच्या अजमान शहरात एका शाळेची मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, 15 जुलै रोजी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 येथे एक लकी ड्रॉ काढला होता, ज्यामध्ये कमलाठी दास नावाच्या महिलेने 1 मिलियन डॉलर्स जिंकले. ही शिक्षिका बराच काळापासून यूएईमध्ये राहतेय आणि अजमानमधील इंडियन हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहे. या विजयाबद्दल मी कृतज्ञ असल्याचे दास यांनी सांगितलं आहे. शिक्षिका म्हणते, सध्याच्या काळात ही लॉटरी म्हणजे मोठ्या आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. ती या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी करणार आहे. ज्या शाळेत ती प्राचार्य आहेत त्या शाळेसाठी काही पैसेही खर्च करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे. 1999नंतर दशलक्ष डॉलर्स जिंकणारी दास ही 165वी भारतीय नागरिक असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, यापूर्वीच्या भारतीय वंशाच्या डिक्सन कट्टीथारा अब्राहमने गेल्या महिन्यात रफल ड्रॉमध्ये १० मिलियन दिरहॅम जिंकले होते.

एप्रिलमध्ये अबूधाबी, दुबईमध्ये एका भारतीय ड्रायव्हरने 12 मिलियन दिरहॅम जिंकल्या. जानेवारीत संयुक्त अरब अमिरातीतील एका भारतीयाने अबुधाबीमध्ये सर्वात मोठ्या रफल बक्षिसाची 12 मिलियन दिरहम जिंकले. याव्यतिरिक्त गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अबूधाबी येथे झालेल्या मेगा रफल ड्रॉमध्ये 1 मिलियन दिरहॅम जिंकणार्‍या 10 लोकांमध्ये आठ भारतीयांचा समावेश होता.

हेही वाचा

गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

Web Title: teacher luck online 1 million us dollars lucky draw dubai indian women school principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.