भुकंपानंतर १२० तासांनी किशोरवयीन मुलाची झाली सुटका

By admin | Published: May 1, 2015 01:53 AM2015-05-01T01:53:29+5:302015-05-01T01:53:29+5:30

नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली

A teenage boy has been released after 120 hours of earthquake | भुकंपानंतर १२० तासांनी किशोरवयीन मुलाची झाली सुटका

भुकंपानंतर १२० तासांनी किशोरवयीन मुलाची झाली सुटका

Next

काठमांडू : नेपाळला भूकंपाचा भीषण धक्का बसला त्याला आता पाच दिवस उलटले आहेत. आपत्तीशी झगडणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी घटना गुरुवारी घडली असून, १२० तास ढिगाऱ्याखालील किशोरवयीन मुलाची सुखरूप सुटका हा एक चमत्कारच मानावा लागेल. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येण्याचीच ही वेळ. काठमांडू शहरात गुरुवारी असाच चमत्कार घडला. १५ वर्षांच्या मुलाला पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी ३० वर्षीय महिलेचीही बचावदलाने सुटका केली.
पेम्बा लामा असे या मुलाचे नाव आहे. शनिवारचा भीषण भूकंप झाला तेव्हाच कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला; पण इमारतीचे दोन खांब एकमेकांवर पडले व मधल्या पोकळीत पेमा लांबा असल्याने त्याच्यासाठी हवेची पोकळी तयार झाली. त्याच्या रडण्याचा अगदी मंद असा आवाज कानावर पडल्यानंतर अमेरिकन व नेपाळी पथकाने त्याची सुटका केली.
पेम्बाची सुटका होताच घटनास्थळी जमलेल्या मोठ्या जमावात आनंदाची लहर फिरली. सात मजली गेस्ट हाऊसच्या ढिगाऱ्याखालून पाच दिवसांनी हा मुलगा जिवंत बाहेर पडला.
या घटनेने नेपाळमधील भूकंपपीडितांच्या मनात एक आशेचा किरण फुलला.


पाकने पाठविला बीफ मसाला
४काठमांडू : नेपाळमधील भूकंपानंतर, तेथील हजारो लोक भुकेले असून, अन्नाची वाट पाहत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी पाकिस्ताननेही दोन विमाने पाठविली; पण त्यातून आलेल्या अन्नपपदार्थात बीफ मसाल्याची पाकिटे असल्याने धक्का बसलेल्या लोकांनी या पाकिटांना स्पर्शही केला नाही. भारताप्रमाणेच नेपाळमध्ये गाय पवित्र समजली जाते.
४गाईस मारण्यास तिथे बंदी असून, या गुन्ह्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे. नेपाळमध्ये बीफ मसाला पाठविणे ही काही जणांच्या मते असंवेदनशीलता तर काही जणांच्या मते पाकने केलेली ही क्रूर थट्टा आहे. ‘डेली मेल’मध्ये आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या मदतीतील अन्नाची पाकिटे कशाची आहेत हे प्रथम भारतीय डॉक्टरांनी पाहिले व नंतर अधिकाऱ्यांना सांगितले.


दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका
४नवी दिल्ली : नेपाळमधील भीषण भूकंपानंतर नेपाळ-भारत सीमा दहशतवाद्यांसाठी धोकादायक झाली असून, भूकंपबळींच्या वेशात दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारत- नेपाळ सीमेवर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्याचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ला करण्याच्या दृष्टीने अनेक दहशतवादी संघटना आपले सदस्य भारतात घुसविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

४हा धोका लक्षात घेऊन गुप्तचर संघटना आयबीने एक निवेदन प्रसिद्ध केले असून उत्तर प्रदेश सरकारला अलर्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर असणाऱ्या महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहारिच, लखीमपूर खेरी व पिलिभीत या शहरांच्या सीमेवर गस्त वाढवावी असे आयबीने या निवेदनात म्हटले आहे.

४नेपाळमधील भूकंपबळींची संख्या १५ हजारांवर जाण्याची भीती नेपाळच्या सैन्यप्रमुखांनी गुरुवारी व्यक्त केली. आतापर्यंत सुमारे ६,००० हजार मृतदेह सापडले असून, ११ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. अद्याप अनेक भागांत मदत आणि बचाव पथके पोहोचायची आहेत.
४नेपाळचे सैन्यप्रमुख जनरल गौरव राणा यांनी सांगितले की, आमच्या अंदाजानुसार भूकंपबळींची संख्या १० ते १५ हजारांदरम्यान राहील. मदत न पोहोचल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.


याची आम्हाला जाणीव असून भूकंपोत्तर आजारांचा प्रादुर्भाव रोखणे हा आमच्या अजेंड्यावरील मुख्य मुद्दा आहे. तत्पूर्वी, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी भूकंपबळींची संख्या १० हजारांवर जाण्याची भीती व्यक्त केली होती.

 

Web Title: A teenage boy has been released after 120 hours of earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.