किडनॅपर्सपासून वाचण्यासाठी बिल्डींगवरून मुलीने घेतली उडी, ३० फूट खाली पडल्यावर झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 12:16 PM2021-09-04T12:16:43+5:302021-09-04T12:19:41+5:30
कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे.
तुर्कीच्या अंताल्या शहरातील इमारतीवरून उडी घेत स्वत:चा जीव वाचवण्याची एक थरारक घटना समोर आली आहे. इथे एका टीनएजरने स्वत:चा जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून खाली उडी मारली. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीला किडनॅप करून तिच शोषण करण्यात आलं होतं.
कथितपणे अत्याचार झाल्यावर १९ वर्षीय सिरीनने नाटकीय अंदाजात खिडकीतून उडी घेत आपला जीव वाचण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या गुरूवारची आहे. जेव्हा तिने फ्लॅटच्या खिडकीतून खाली उडी घेतली त्यावेळी तिची टक्कर एका कारसोबत झाली. यानंतर तिथे उपस्थित लोक तिच्या मदतीसाठी धावून आले. यावेळी लोकांनी पोलिसांनाही फोन केला. ३० फूट खाली पडण्याआधी सिरीन मदतीसाठी ओरडत होती. रक्ताने माखलेली सिरीन गंभीरपणे जखमी होती. तिला पॅरामेडिकल स्टाफने स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. (हे पण वाचा : ८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार)
बेशुद्ध झाल्यावर तिने आरोप लावला की, 'ईराणच्या काही लोकांनी मला किडनॅप करून माझ्यावर अत्याचार केले. त्यांनी मला विकण्याचा प्रयत्न केला'. सिरीनची उडी बघणाऱ्या साहिन नावाच्या व्यक्तीने तुर्कीची न्यूज वेबसाटइ हॅबरलरला सांगितलं की, मी किचनमध्ये होतो त्याचवेळी मला तिचा आवाज आला की, मला मरायचं आहे. एका दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'आम्ही तिला उडी मारू नको असं सांगितलं होतं की, पण तिने ऐकलं नाही. ती ओरडत होती की, तिच्यावर अत्याचार झाला आहे. ती मदत मागत होती'.