Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर लंडनच्या मुलीवर गंभीर दुष्परिणाम; शरीरातील नसा फाटल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 03:02 PM2021-06-27T15:02:29+5:302021-06-27T15:04:27+5:30

Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अनेकांवर त्याचा वाईट परिमाण झाल्याचंही दिसून आलं आहे. यात काहींना अतिताप येतो तर काहींना शरीरावर एलर्जीसारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.

Teenager's 'veins burst leaving her in wheelchair' after rare reaction to Covid vaccine | Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर लंडनच्या मुलीवर गंभीर दुष्परिणाम; शरीरातील नसा फाटल्या अन्...

Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर लंडनच्या मुलीवर गंभीर दुष्परिणाम; शरीरातील नसा फाटल्या अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देलंडनमध्ये राहणारी १९ वर्षीय कॉर्टनी किटिंग (Courtney Keating) हिला लसीकरणानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागत आहे. कॉर्टनीने याबाबत डॉक्टरांना दाखवलं असता तपासात तिच्या पायातील नसा शरीराच्या आतमध्ये फाटल्या असल्याचं आढळलंकॉर्टनी म्हणते की, जर ती वेळेवर हॉस्पिटलला आली नसती तर त्याचे खूप गंभीर परिणाम दिसून आले असते

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे जीव गेले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी संशोधकांनी रात्रदिवस मेहनत घेऊन लस शोधून काढली. लसींच्या चाचणीनंतर प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करण्यात आले. आजच्या घडीला जगात २५० कोटींहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. प्रत्येक देश लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवत आहे.

लस घेतल्यानंतर अनेकांवर त्याचा वाईट परिमाण झाल्याचंही दिसून आलं आहे. यात काहींना अतिताप येतो तर काहींना शरीरावर एलर्जीसारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. याचवेळी लंडनमध्ये राहणारी १९ वर्षीय कॉर्टनी किटिंग(Courtney Keating)  हिला लसीकरणानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागत आहे. लसीकरणानंतर एक महिन्यात तिला व्हिलचेअरवरून उठता येणंही शक्य नाही. अद्यापही कॉर्टनीला चालताना त्रास होत आहे. लस घेतल्यानंतर काही वेळात कॉर्टनीच्या पायात वेदना व्हायला सुरुवात झाली.

त्यानंतर हळूहळू तिच्या पायाच्या नसा ठळकपणे दिसू लागल्या. जेव्हा कॉर्टनीने याबाबत डॉक्टरांना दाखवलं असता तपासात तिच्या पायातील नसा शरीराच्या आतमध्ये फाटल्या असल्याचं आढळलं. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. आता कॉर्टनीने फेसबुकवर तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार शेअर केला आहे. कॉर्टनी अन्य लोकांना लसीपासून होणाऱ्या एलर्जीबाबत सतर्क करू इच्छिते. त्यामुळे तिने फेसबुकवर काही फोटोही शेअर केले आहेत.

Woman's 'veins burst and she ended up in a wheelchair after rare reaction to Covid vaccine' - UK News Agency

कॉर्टनी म्हणते की, जर ती वेळेवर हॉस्पिटलला आली नसती तर त्याचे खूप गंभीर परिणाम दिसून आले असते. कदाचित तिचा पाय कापण्याची वेळही तिच्यावर आली असती. तिच्या शरीरातील त्वचेमध्ये नसा फाटल्याने रक्त येत होतं. त्यामुळे तिच्या पायावर लालसर डाग पडले होते. अंशत: तिच्या हातांवर आणि पाठीवरही ते डाग दिसू लागले होते. शरीराच्या या भागातही नसा फाटून रक्त येत होतं.

लोकांना केले आवाहन

कॉर्टनीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून लसीपासून होणाऱ्या एलर्जीबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या २ महिन्यांपासून मी स्ट्रगल करतेय, १ महिना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती. त्यानंतर आता हळूहळू ती चालायला शिकत आहे. कोविड १९ लसीकरणानंतर अनेक परिणाम समोर आले आहेत. अनेक लोकांवर लसीचे दुष्परिणाम झालेत. मात्र लोकांनी लसीकरण करण्यापासून घाबरू नये. प्रत्येकाच्या शरीरात लसीचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. सध्या कोरोनावर लसीकरण करणं हा एकमेव उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.  

Web Title: Teenager's 'veins burst leaving her in wheelchair' after rare reaction to Covid vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.