Telegramचे सीईओ पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये अटक, खासगी जेटने अझरबैजानला जाताना कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 08:47 AM2024-08-25T08:47:36+5:302024-08-25T08:48:37+5:30

टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल ड्यूरोव यांना पॅरिसच्या बाहेर बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली.

Telegram app CEO Pavel Durov reportedly arrested at airport in France | Telegramचे सीईओ पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये अटक, खासगी जेटने अझरबैजानला जाताना कारवाई

Telegramचे सीईओ पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये अटक, खासगी जेटने अझरबैजानला जाताना कारवाई

Telegram CEO arrested: टेलिग्राम मेसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल ड्यूरोव (Pavel Durov) यांना पॅरिसच्या बाहेर बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली. TF1 TV आणि BFM TV ने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूरोव त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते. त्यावेळी पोलीस तपासाचा एक भाग म्हणून अटक वॉरंट जारी करत त्यांना अटक करण्यात आली. यावर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच फ्रान्सचे गृह मंत्रालय आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टेलीग्राम या ॲपवर नियंत्रणाची कमतरता असल्याच्या संबंधित या पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांचा असा दावा आहे की मॉडरेटरच्या कमतरतेमुळे या मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा सुरू राहू शकतात. दुबईतून कारभार चालणाऱ्या टेलिग्रामची स्थापना रशियन वंशाच्या ड्यूरोव यांनी केली होती. ड्यूरोव यांनी व्हीके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु केला होता. त्याच्या माध्यमातून सरकारच्या विरोधी होत असलेल्या कारवायांना आळा घातला जावा, असे सरकारने सांगितले होते. पण याचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर ड्यूरोव यांनी ती कंपनी विकली आणि २०१४ मध्ये रशिया सोडला.

रशिया, युक्रेन आणि पूर्वेकडील सोव्हिएत देशांमध्ये प्रभाव असलेले टेलिग्राम हे फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि वीचॅट इतकेच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पुढील वर्षी एक अब्ज युजर्सपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

Web Title: Telegram app CEO Pavel Durov reportedly arrested at airport in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.