आणखी चार वर्षांनी पृथ्वीची आग-आग होणार, तापमान वाढणार... माणसांचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 04:20 PM2023-05-18T16:20:22+5:302023-05-18T16:21:12+5:30

Temperature Increase in World: अजून चार वर्षांनी पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. दर पाच वर्षांनी एक वर्ष रेकॉर्डब्रेक होईल.

temperature will reach one and half degree upwards by 2027 world will suffer this loss humans in danger | आणखी चार वर्षांनी पृथ्वीची आग-आग होणार, तापमान वाढणार... माणसांचे काय होणार?

आणखी चार वर्षांनी पृथ्वीची आग-आग होणार, तापमान वाढणार... माणसांचे काय होणार?

googlenewsNext

1.5 Degree Temperature Increase in 2027: अजून चार वर्षे म्हणजेच 2027 पूर्वी संपूर्ण जगाचे सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल. जागतिक हवामान संघटनेने ((World Meteorological Organization WMO) हा धक्कादायक खुलासा केला आहे. याचा अर्थ असा नाही की जगाचे तापमान 2015 च्या पॅरिस कराराच्या पातळीच्या वर जाईल, पण उष्णता वाढेल हे नक्की आहे. त्यामुळे लोकांची अवस्था बिकट होणार आहे. पृथ्वीवर जळजळ वाढत जाईल. हवामानाच्या वेळा बदलतील. संकटे येतील. 30 वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे WMO ने हा खुलासा केला आहे. 2027 पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची 66 टक्के शक्यता असल्याचेही म्हटले आहे.

ब्रिटनच्या मेट ऑफिस हॅडली सेंटरमधील लांब पल्ल्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अॅडम स्कॅफे म्हणाले की, पुढील चार-पाच वर्षांत आपण उष्णतेची ऐतिहासिक विक्रमी पातळी पाहू शकतो. तापमान दीड अंश सेल्सिअस वर जाईल. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता 50-50 होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ते ६६ टक्के आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे त्याला 'ग्लोबल अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट' असे नाव देण्यात आले आहे.

दर पाच वर्षांतील एक वर्ष अत्यंत उष्ण असेल

WMO ने आणखी एक चिंताजनक इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्माघात होण्याची 98 टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. सन २०१६ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हे एक मोठे हवामान संकट आहे, ज्याकडे बहुतेक देश गांभीर्याने पाहत नाहीत.

जग हरितगृह वायूंना रोखू शकलेले नाही

तात्पुरते तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढले तरी संपूर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, असे अॅडम सांगतात. अवकाळी पाऊस, अचानक पूर, दुष्काळ, धुळीची वादळे, समुद्राची पातळी वाढणे. सागरी वादळे अशा घटना होऊ शकतील. याचा अर्थ हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखण्यात संपूर्ण जग अपयशी ठरले आहे.

हवामान बदलामुळे आणखी एल निनो येईल

जोपर्यंत आपण हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करत नाही, तोपर्यंत आपण वाढत्या उष्णतेला रोखू शकणार नाही. वेगवेगळ्या देशांच्या प्रत्येक हंगामावर याचा परिणाम होईल. भारताची स्थिती आणखी बिकट होईल कारण जेव्हा मानवामुळे होणारे हवामान बदल एल-निनोशी जोडले जातात तेव्हा परिस्थिती आणखी बिघडेल.

एल निनो वातावरण, नंतर पृथ्वीवर उष्णता वाढेल

डब्ल्यूएमओचे सरचिटणीस पीटीरी तालास म्हणाले की, अति तापमानवाढीमुळे एल-निनोची परिस्थितीही निर्माण होईल. यामुळे, उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराचा वरचा पृष्ठभाग उष्ण करेल. त्यामुळे वातावरणही उष्ण राहणार आहे. जेव्हा वातावरण तापते तेव्हा संपूर्ण जगाचे तापमान वाढेल. येत्या काही महिन्यांत अल-निनोचा प्रभाव संपूर्ण जगावर पाहायला मिळणार आहे.

संपूर्ण जगाला उष्णतेचा फटका सहन करावा लागणार

एल निनो प्रक्रिया सामान्य हवामान बदलापेक्षा वेगळी आहे. मात्र हवामान बदलामुळे येणारा एल-निनो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे उत्तर अमेरिकेचे तापमान वाढणार आहे. दक्षिण अमेरिकेत दुष्काळ पडू शकतो. यासोबतच अॅमेझॉनच्या जंगलांसह जगातील अनेक देशांच्या जंगलांमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. याआधी, शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की 2017 ते 2021 या वर्षांमध्ये तापमान दीड अंशाने वाढण्याची केवळ 10 टक्के शक्यता आहे. मात्र पुढील काही वर्षांत पारा 66 टक्के वाढण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएमओचा अंदाज वेगळा आहे.

Web Title: temperature will reach one and half degree upwards by 2027 world will suffer this loss humans in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.