बांगलात मंदिरावर हल्ला, पुजाऱ्याचा खून

By admin | Published: February 22, 2016 03:35 AM2016-02-22T03:35:58+5:302016-02-22T03:35:58+5:30

उत्तर बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील देवगंज गावात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला. त्यात पुजारी जनेश्वर रॉय यांचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी

In the temple of Bangles in Bangladesh, the murder of Pujara | बांगलात मंदिरावर हल्ला, पुजाऱ्याचा खून

बांगलात मंदिरावर हल्ला, पुजाऱ्याचा खून

Next

ढाका : उत्तर बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील देवगंज गावात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला. त्यात पुजारी जनेश्वर रॉय यांचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन भाविकही जखमी झाले.
पंचगढ जिल्हा भारतीय सीमेला लागून आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर बहुधा तिघे होते आणि दुचाकीवरून आले होते. घटना घडल्यानंतर ते फरार झाले.
भाविकांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, प्रारंभी हल्लेखोरांनी मंदिरावर दगडफेक केली. त्यामुळे काय घडले हे पाहण्यासाठी पुजारी जनेश्वर रॉय बाहेर आले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर लगेचच हल्ला करून त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केला; मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबार केला आणि देशी बॉम्ब फेकले.
यावेळी पुजाऱ्याला वाचविण्यासाठी आलेले दोन जण गोळीबारात जखमी झाले. हल्लेखोरांची ओळख पटू शकली नाही किंवा पुजाऱ्याचा खून करण्यामागचा त्यांचा हेतूही कळू शकला नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.
सुन्नीबहुल बांगलादेशात अलीकडील काही महिन्यांत धार्मिक अल्पसंख्याक समुदायावर सुुनियोजित हल्ले झाले आहेत. त्यात दोन विदेशी नागरिकांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून, १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

Web Title: In the temple of Bangles in Bangladesh, the murder of Pujara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.