चिनी भातशेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 12:31 AM2017-06-02T00:31:36+5:302017-06-02T00:31:36+5:30
जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे
जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पीक आहे. जगात भारत तांदळाचे पीक घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अनेक मोठ्या राज्यांत तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम व पंजाब राज्यांना तांदळाचे पीक घेणारे राज्य समजले जाते.
दक्षिण भारतात तांदूळ हे मोठ्या संख्येतील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्याच्या पिकाबद्दल लोकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत; परंतु नुकतेच चीनचे लू होउयुआन यांनी आपल्या संशोधनात मोठा खुलासा केला आहे. लू होउयुआन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्समध्ये संशोधन करतात. त्यांच्या संशोधनात एक बाब स्पष्ट झाली की, जेव्हा युग परिवर्तन घडत होते. पृथ्वी जेव्हा जुने युग म्हणजे प्लाइस्टसीनमधून नवे युग म्हणजे हेलोसीनमध्ये परिवर्तीत होत होते त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. पर्यावरणीय व भौगोलिक परिवर्तन वेगाने घडत होते.
अशा त्या काळात दहा हजार वर्षे आधी हेलोसीनमध्ये नव्या वनस्पतीही विकसित झाल्या होत्या. त्यात तांदळाचीही उत्पत्ती झाली. या दरम्यान चीनने आपले देशांतर्गत उत्पादन सगळ्यात आधी सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणावर त्याची शेती सुरू केली होती. नुकतेच त्यांचे हे संशोधन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसचे यूएस प्रोसिडिंग्जमध्ये प्रसिद्ध झाले. चीनच्या झिंझियांग प्रांतचे चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये अवशेष आणि पुरातत्व संस्थान, भौगोलिक विज्ञान संस्थान आणि नैसर्गिक संसाधन अनुसंधान संस्थानमध्ये या विषयात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर तांदळाची शेती सगळ्यात आधी कुठे सुरू झाली, यावर भर आहे.