खेळ खल्लास! वॉलेटमध्ये १७०० कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला, आता उडाली झोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 02:26 PM2021-01-14T14:26:14+5:302021-01-14T14:26:52+5:30

स्टीफनने काही वर्षांपूर्वी ७,००२ क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन खरेदी केले होते. जे त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये पडलेले आहेत. आता या बिटक्वाइनची किंमत वाढून १७०० कोटी रूपये झाली आहे.

Tens of billions worth of bitcoin cryptocurrency have been locked by people who forgot their key | खेळ खल्लास! वॉलेटमध्ये १७०० कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला, आता उडाली झोप...

खेळ खल्लास! वॉलेटमध्ये १७०० कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला, आता उडाली झोप...

Next

सॅनफ्रान्सिस्कोचा प्रोग्रामर स्टीफन थॉमस याची दिवसरात्रीची झोप उडाली आहे. त्याचं कारण आहे एक पासवर्ड. तो पासवर्ड तो विसरला आणि त्याची झोप उडाली. जर त्याला हा पासवर्ड आठवला तर तो अब्जाधीश बनू शकतो. कारण तो या पासवर्डने ते डिजिटल वॉलेट उघडून शकेल ज्यात त्याचे  १७०० कोटी रूपये पडलेले आहेत. स्टीफनने काही वर्षांपूर्वी ७,००२ क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन खरेदी केले होते. जे त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये पडलेले आहेत.

आता या बिटक्वाइनची किंमत वाढून १७०० कोटी रूपये झाली आहे. पण स्टीफनसाठी हे अब्जो रूपये केवळ आकडे बनून राहिले आहेत. कारण तो एका पासवर्डनेच एक छोटी हार्डड्राइव उघडू शकले ज्याला आयर्न म्हणतात. यात त्या वॉलेटची प्रायव्हेट की आहे ज्यात बिटक्वाइन ठेवले आहेत. स्टीफनने बिटक्वाइन खरेदी करून आयर्नचा पासवर्ड कागदावर लिहिला होता. आता तो कागद हरवला. 

२ चुकीचे पासवर्ड टाकले तर पैसे फुर्रर्रर्र....

आता बिटक्वाइनची किंमत वाढताच त्याला त्याच्या संपत्तीची आठवण झाली. पण तो ती मिळवू शकत नाहीये. त्याने पासवर्ड आठवण्याचा शक्य तो प्रयत्न केला. पण अडचण ही आहे की, तो केवळ १० प्रयत्नच करू शकतो. त्यानंतर वॉलेट नेहमीसाठी लॉक होईल. त्याने आतापर्यंत आठ वेळा चुकीचे पासवर्ड टाकून वॉलेट उघडण्याचा प्रयत्न केला. आता केवळ २ संधी शिल्लक आहेत. म्हणजे २ चुका आणि १७०० कोटी रूपये फुर्र...

बिटक्वाइनची कोणतीही रेग्युलेटरी संस्था नाही, ना यावर कोणत्या कंपनीचं नियंत्रण आहे. त्यामुळे पासवर्ड तयार करण्यासारखी सुविधा नाही. या मुद्रेचा निर्माता सातोषी नाकामोटो नावाची व्यक्ती आहे. बिटक्वाइनची त्याची आयडिया होती की, कुठून डिजिटल अकाउंट उघडून बिटक्वाइन ठेवता येतील. ज्यावर कोणत्याही सरकारचं किंवा संस्थेचं नियंत्रण नसावं. पण ही व्यवस्था आता लोकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे.

१० लाख कोटी रूपयांचे बिटक्वाइन असेच लोकांनी गमावलेत

वॉलेट रिकवरी सर्व्हिस चेनालिसिस सांगते की, जगात १.८५ कोटी बिटक्वाइन आहेत. यातील २० टक्के (१० लाख कोटी रूपये) त्यांच्या मालकांनी गमावले आहेत. ही कंपनी डिजिटल की मिळवून देण्यात करते. त्यांच्या पासवर्ड रिकवरीसाठी रोज ७० फोन येतात. ही फोन गेल्या सहा महिन्यात तिपटीने वाढले आहेत. बिटक्वाइन ब्लॉग Chainalysis चा अंदाज आहे की, ५ बिटक्वाइनपैकी एक नेहमीसाठी हरवला आहे. या हरवलेल्या बिटक्वाइनची किंमत यावेळच्या भावानुसार साधारण १४ हजार कोटी डॉलर इतकी आहे. 
 

Web Title: Tens of billions worth of bitcoin cryptocurrency have been locked by people who forgot their key

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.