मध्य-पूर्वेत तणाव वाढला; भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार? अब्जावधी डॉलर्स पणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 07:52 PM2024-07-31T19:52:20+5:302024-07-31T19:52:52+5:30

Hamas leader Ismail Haniyeh assassinated: हमास प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे.

Tensions rise in the Middle East; Will there be a big impact on India's economy? Billions of dollars at stake | मध्य-पूर्वेत तणाव वाढला; भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार? अब्जावधी डॉलर्स पणाला...

मध्य-पूर्वेत तणाव वाढला; भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार? अब्जावधी डॉलर्स पणाला...

Hamas leader Ismail Haniyeh assassinated: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले इस्रायल-हमास युद्ध आणखी वाढण्याची शक्यता आहे. हमास प्रमुख इस्माईल हानिया मारला गेला आहे. इस्रायलने इराणची राजधानी तेहरान येथील घरावर केलेलया हवाई हल्ल्यात हानियाचा मृत्यू झाला. हमासला संरक्षण देणाऱ्या इराणलाही मोठा धक्का बसला आहे. हानियाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हमासच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये इराणचे लष्करप्रमुखही उपस्थित होते. या बैठकीनंतर इराण आणि इस्रायलमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय परिणाम होईल?
इराण आणि इस्रायलमध्ये सध्या अधिकृत युद्ध सुरू नाही, परंतु अनेकदा दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटत राहतो. हमासचा समर्थक असलेला इराण, लेबनॉनचा हिजबुल्ला, येमेनचा हुथी, हे सगळे इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारू शकतात. अशा परिस्थितीत आणखी मोठ्या युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. हानियाच्या मृत्यूमुळे इराणलाही मोठा धक्का बसला आहे. हानिया इराणच्या संरक्षणाखाली असल्याने त्याचे संरक्षण करण्यात तो अपयशी ठरला. अशा स्थितीत इराण या हल्ल्याचा बदला घेईल की काय, अशी भीती वाढली आहे. हानियाच्या मृत्यूमुळे इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर परिणाम होणार आहे. इस्माईल हनियाच्या मृत्यूनंतर गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक धोकादायक बनू शकते, असे मानले जात आहे.

हानियाच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत तणाव; भारतावर काय परिणाम होईल?

हानियाचा मृत्यूमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढणार आहे. मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम जगभरातील देशांवर होणार आहे. भारतही यातून सुटू शकणार नाही. इस्माईल हनियाच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला तर त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होईल. भारतापासून 4500 किमी अंतरावर हे घडत असले तरी या संघर्षाचा आणि तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. आयात-निर्यात खंडित झाल्यामुळे व्यवसाय आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारत कच्च्या तेलाच्या गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. आपल्या गरजेच्या 85 टक्के आयात करतो. अशा स्थितीत मध्यपूर्वेत तणाव वाढल्यास तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तेलाच्या किमती वाढल्याने भारताचा व्यापार संतुलन, परकीय चलन साठा आणि रुपयाच्या मूल्यावर परिणाम होईल.

कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम
भारत तेलासाठी इराणवर अवलंबून नाही, पण चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. युद्ध झाले किंवा तणाव वाढला तर रशियाकडून तेल विकत घेण्याची स्पर्धा निर्माण होईल, त्याचा परिणाम किमतीवर दिसून येईल. एवढेच नाही, तर या संघर्षाचा परिणाम तेलाच्या वाहतुकीवरही दिसून येईल. हानियाच्या हत्येमुळे इराण आणि इस्रायलमधील तणाव आणखी वाढला तर भारताच्या संरक्षण पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. आपण आकडेवारी पाहिली तर 2014-15 या आर्थिक वर्षात भारत-इराण व्यापार 13.13 अब्ज डॉलर्सचा होता. तेल व्यतिरिक्त भारत सुका मेवा, रसायने आणि काचेची भांडी इराणकडून खरेदी करतो. तर इराण भारताकडून बासमती तांदूळ, चहा, कॉफी आणि साखर खरेदी करतो. आता इराण आणि इस्रायलमधील युद्ध वाढले तर भारताच्या आयात-निर्यातीवर परिणाम होईल, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याची भीती आहे, साहजिकच तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम महागाईवर होईल.

युद्धाचे दुष्परिणाम
भारत आणि इस्रायलमध्ये शस्त्रास्त्रांची सर्वाधिक खरेदी आणि विक्री होते. 2023 मध्ये भारताने इस्रायलसोबत 89000 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, ज्यामध्ये संरक्षण शस्त्रे, पॉलिश केलेले हिरे, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी वस्तूंचा समावेश आहे. इस्रायल आणि इराणमध्येही संघर्ष सुरू झाला तर भारताच्या संरक्षण पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणजे इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. इस्रायल हा भारताला सामरिक पुरवठादार आहे, तर इराण मध्य आशिया आणि पूर्व युरोपीय देशांशी जोडणीसाठी आवश्यक आहे. संघर्ष झाला तर भारतही त्याच्या प्रभावापासून वाचू शकणार नाही. भारत हा इस्रायलसाठी आशियातील तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. इस्रायली कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे. युद्ध झाले तर या सगळ्यावर परिणाम होईल. 

Web Title: Tensions rise in the Middle East; Will there be a big impact on India's economy? Billions of dollars at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.