तेरेसा यांनी बहुमत गमावले

By admin | Published: June 10, 2017 12:20 AM2017-06-10T00:20:22+5:302017-06-10T00:20:22+5:30

लवकर निवडणुका घेऊन आपले स्थान बळकट करण्याचा इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा प्रयत्न शुक्रवारी मतदारांनी अपयशी ठरवला.

Teresa lost a majority | तेरेसा यांनी बहुमत गमावले

तेरेसा यांनी बहुमत गमावले

Next

लंडन : लवकर निवडणुका घेऊन आपले स्थान बळकट करण्याचा इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा प्रयत्न शुक्रवारी मतदारांनी अपयशी ठरवला. संसदेतील त्यांचे बहुमत या निवडणुकांनी हिसकावून घेतले. तरीही त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या असून, तेरेसा मे आता अल्पमतातील सरकार स्थापन करतील. निकालांनतर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लेबर पक्षाने केली. पण राजीनामा देणार नाही, असे मे यांनी स्पष्ट केले.
संसद त्रिशंकू अवस्थेत गेली असून मे यांना सरकार स्थापण्यासाठी छोट्या नॉर्दर्न आयरीश पक्षाचा पाठिंबा घ्यायची वेळ आली आहे. जेरेमी कॉर्बीन यांच्या नेतृत्वाखालील लेबर पार्टीने या निवडणुकीत चांगला ठसा उमटवला. या निकालांनी ब्रिटनचे राजकारण गोंधळात सापडले. १९ जूनपासून ब्रेक्झिटसाठी बोलणी सुरू होणार असताना मे या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडल्या आहेत.
६५० जागांपैकी बहुतेक जागांचे निकाल जाहीर झाले. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने ३१८ तर विरोधी लेबर पक्षाने २६१ जागा जिंकल्या. बहुमतासाठी लागणाऱ्या ३२६ जागा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला मिळाल्या नाहीत. मे यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मानले गेले होते परंतु निकाल धक्कादायक ठरले. ब्रिटिश प्रसारमाध्यमांच्या मतानुसार मे यांनी पदावर राहणे हे ‘अवमानकारक’ आहे. मे यांनी साऊथ-ईस्ट इंग्लंडमधून विजय मिळवला. संसदेत बहुमत गमावल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतो आहे.

Web Title: Teresa lost a majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.