चर्चेसाठी अटी मान्य नाहीत -पाकिस्तान
By admin | Published: November 7, 2014 04:30 AM2014-11-07T04:30:21+5:302014-11-07T04:30:21+5:30
भारताशी चर्चा करायची की फुटीरवाद्यांशी हे आधी ठरवा या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या विधानावर पाकिस्तानने गुरुवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली
इस्लामाबाद : भारताशी चर्चा करायची की फुटीरवाद्यांशी हे आधी ठरवा या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या विधानावर पाकिस्तानने गुरुवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उभय देशातील चर्चा म्हणजे एक देश दुसऱ्या देशावर मेहरबानी करत नाही त्यामुळे चर्चा प्रक्रियेत आपणास कोणत्याही अटी शर्ती मान्य नाहीत, असे पाकने म्हटले आहे.
विभागातील शांततेसाठी भारत-पाकदरम्यान चर्चा आवश्यक असून शांततेमुळेच दक्षिण आशियाला आर्थिक विकासावर त्याचप्रमाणे जनकल्याणावर लक्ष केंद्रित करता येऊ शकेल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम यांनी सांगितले.
जेटलींच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या बोलत होत्या. काश्मिरी लोक फुटीरवादी नाहीत, असा जावई शोधही त्यांनी लावला. (वृत्तसंस्था)