दहशतवाद हा जागतिक धोका

By admin | Published: July 12, 2015 11:15 PM2015-07-12T23:15:29+5:302015-07-12T23:15:29+5:30

किर्गिझस्तान व भारत यांच्यात चार करार झाल्याची घोषणा करण्यात आली असून, त्यातील एका कराराअंतर्गत दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य बळकट

Terrorism is a global threat | दहशतवाद हा जागतिक धोका

दहशतवाद हा जागतिक धोका

Next

बिश्केक : किर्गिझस्तान व भारत यांच्यात चार करार झाल्याची घोषणा करण्यात आली असून, त्यातील एका कराराअंतर्गत दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य बळकट करण्याचा, तसेच संयुक्त लष्करी सराव करण्याचाही निर्णय घेण्यात आला. खंजर २०१५ असे या सरावाचे नाव असेल. दहशतवाद व मूलतत्त्ववाद हे कोणत्याही सीमा नसणारे धोके आहेत असा इशारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिझस्तानात बोलताना दिला.
जगाच्या या भागामध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असताना उभय देशांना शांततापूर्ण व सुरक्षित शेजाराची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा बीमोड करण्याचे काम दोन्ही देशांच्या हिताचे आहे असे पंतप्रधान मोदी यांनी किर्गिझस्तानचे अध्यक्ष अल्माझबेक अत्माबायेव यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
या पाच देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दौऱ्यामुळे मध्य आशियाशी नवे बंध निर्माण झाले आहेत. किर्गिझशी त्यात अधिक आपलेपणाचे संबंध आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Terrorism is a global threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.