पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 09:01 AM2024-10-17T09:01:07+5:302024-10-17T09:02:05+5:30

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

Terrorism, separatism is becoming an obstacle says Jaishankar in pakistan | पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर

इस्लामाबाद : जर सीमेपलीकडील हालचाली दहशतवाद, अतिरेकवाद व फुटीरतावाद या तीन वाईट कृत्यांवर आधारित असतील तर व्यापार, ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता धूसर होते, असे नमूद करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर  पाकला खडेबोल सुनावले. 

  व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करताना बुधवारी जयशंकर बोलत होते. 

कुठलेही सहकार्य हे परस्पर आदर व सार्वभौमत्वाच्या समानतेवर आधारित असले पाहिजे. एससीओच्या प्रत्येक सदस्य राष्ट्राने समूहाच्या प्रत्येक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. शांघाय सहकार्य संघटनेची(एससीओ) व्याप्ती वाढण्याची गरज 
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.   

परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असावेत
- परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी असण्याच्या भावनेला बळकटी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
- क्षेत्रीय सहकार्यावर बोलताना दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकची चांगलीच कानउघडणी केली.
- पाकला खडेबोल सुनावतानाच पूर्व लडाखमधील भारत व  चीनच्या लष्करामधील तणाव, हिंद महासागर व इतर धोरणात्मक जलक्षेत्रात चीनच्या वाढत्या शक्तीचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली.
- या शिखर संमेलनाचे अध्यक्ष व पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे उद्घाटनाचे भाषण झाल्यानंतर लगेच जयशंकर यांनी संबोधित केले. 

चीनच्या योजनेला भारताचा विरोधच
चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या योजनेला पाठिंबा देण्यास भारताने पुन्हा एकदा नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेला पाठिंबा न देणारा भारत हा एससीओमधील एकमेव देश ठरला आहे. 

ओबीओआर ही योजना चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ओबीओआरचा मार्ग जाणार आहे. या गोष्टी व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारताने या योजनेला बुधवारी विरोध केला..

एससीओचा उद्देश...
संतुलित विकास, एकात्मता व संघर्ष रोखण्यासाठी सकारात्मक शक्ती बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रादेशिक स्वरूपाचे बहुआयामी सहकार्य विकसित करणे, हादेखील संघटनेचा उद्देश आहे. 

Web Title: Terrorism, separatism is becoming an obstacle says Jaishankar in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.