इराकच्या तेल रिफायनरींवर दहशतवादी हल्ला
By admin | Published: June 18, 2014 04:43 PM2014-06-18T16:43:33+5:302014-06-18T16:45:12+5:30
तेलासाठी प्रसिध्द असलेल्या इराकवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला.
Next
>ऑनलाइन टीम
बगदाद, दि. १८ - तेलासाठी प्रसिध्द असलेल्या इराकवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधुनिक स्वयंचलित मशिनगन, ग्रेनेड यांच्या सहाय्याने तेल रिफायनरींना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी शुद्ध केलेल्या तेलाचे टॅंकरही पेटवून दिले.
कट्टर सुन्नी दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असून इराकच्या उत्तरेकडील भागात बैजी येथे असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प ताब्यात घेतला आहे. हा इराकमधील मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी चार वाजता दहशतवाद्यांनी तेथील प्रकल्पाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर एकाचवेळी हल्ला चढवला.
हल्ला केल्याचे लक्षात येताच तिन्ही प्रवेशद्वारांवरील सुरक्षा रक्षकांनी सायरन वाजवून प्रकल्पावर काम करणा-या कर्मचा-यांना धोक्याचा इशारा दिला. इशारा मिळताच तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम तातडीने थांबविले. अमेरिकेने बगदाद येथील आपल्या दूतावासाच्या संरक्षणासाठी २७५ सैनिकांची तुकडी नियुक्त केली आहे. भारत, अमेरिकेसह अन्य देशांनीही इराकमधील आपापल्या राजनैतिक अधिका-यांना देशाबाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे.