इस्तांबुलमधील नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ला, 39 ठार
By admin | Published: January 1, 2017 06:20 AM2017-01-01T06:20:48+5:302017-01-01T10:43:40+5:30
टर्कीमधील इस्तांबुल शहरातील एका नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्तांबुल, दि. 01 - टर्कीमधील इस्तांबुल शहरातील एका नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्तांबुलमधील रैना नाईटक्लबमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. येथील स्थानिक वेळेनुसार रात्री 1.30 च्या सुमारास हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी हा नाईटक्लबमध्ये सांता क्लॉजचा ड्रेस परिधान करुन आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा हल्ला झाला त्यावेळी नाईटक्लबमध्ये शंभरहून अधिक जण उपस्थित होते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर टर्कीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
Istanbul's governor says at least 35 killed in terror attack at nightclub, some 40 others wounded:AP
— ANI (@ANI_news) January 1, 2017