अफगानिस्तानच्या काबुल विद्यापीठावर दहशतवाद्यांचा हल्ला, 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 06:17 PM2020-11-02T18:17:29+5:302020-11-02T18:19:16+5:30
विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतववाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली. गोळीबारानंतर अनेकांनी पर्यायी मार्ग अवलंबत सुरक्षित स्थळी दाखल झाले.
मुंबई - अफगाणिस्तानमधील काबूल विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून हल्ल्यात जवळपास १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर गोळीबार केला, या हल्ल्यात ४० जण जखमी झाल्याचेही समजते. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.
How cruel are the people who are the enemies of the pen and the book. Students from Kabul University are trying to save their lives after the attack. May Allah protect them. https://t.co/4VZHCKJNqp
— Saleem Safi (@SaleemKhanSafi) November 2, 2020
विद्यापीठ परिसरात घुसलेल्या दहशतववाद्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली. गोळीबारानंतर अनेकांनी पर्यायी मार्ग अवलंबत सुरक्षित स्थळी दाखल झाले. मात्र, विद्यार्थ्यांना पाहताच त्यांनी गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यापाठिमागे आपला हात नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. तसेच, अद्याप कोणत्याच संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही.