माली येथे दहशतवादी हल्ला; १८ जणांची हत्या
By admin | Published: November 20, 2015 04:48 PM2015-11-20T16:48:52+5:302015-11-20T21:45:42+5:30
बमाको, दि. २० - मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये २ दहशतवाद्याने हल्ला केला आहे. या हल्यात त्यांनी १८ जणांची हत्या केली असल्याचे खात्रीलायक वृत समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
बमाको, दि. २० - मालीची राजधानी असलेल्या बमाको येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये २ दहशतवाद्याने हल्ला केला आहे, त्यांनी १८ जणांची हत्या केली असल्याचे खात्रीलायक वृत समोर आले आहे. हॉटेलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी १७० जणांना बंदी बनवले होते, त्या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे वृत मिळेले आहे. स्थानिक AFP च्या वृतानुसार १७० नागरीकांमधील १८ जणांचे मृतदेह मिळाले आहेत, तर बाकीच्या सर्वांची सुटका करण्यास सुरक्षारक्षकांना यश मिळाले आहे. बंदी केलेल्या १७० मध्ये २० भारतीयांचा समावेश होता, त्यानांही सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचं समजते आहे.
बंदी केलेल्यानां सोडवण्यासाठी घटनास्थळी स्थानिक सुरक्षा दलाबरोबरच यूएन आणि फ्रान्सच्या सैनिकांनी संयुक्त कारवाई करीत सर्वांची सुटका केली असल्याचं वृत आहे. सुरक्षारक्षकांनी हॉटेलच्या चारी बाजूने वेढा घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर अल्लाह-ओ-अकबर, अल्लाह-ओ-अकबर आशा घोषणा देत होते. अद्याप, हल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनी घेतलेली नाही.