पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 23:56 IST2023-11-03T23:51:05+5:302023-11-03T23:56:18+5:30
Terrorist attack on Pakistan Army : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये शुक्रवारी पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सैन्याचा ताफा पासनी येथून ग्वादरकडे जात होता.

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १४ सैनिकांचा मृत्यू
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये शुक्रवारी पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सैन्याचा ताफा पासनी येथून ग्वादरकडे जात होता. तेवढ्यात दहशतवाद्यांनी दोन वाहनांना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या १४ सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर तिथून फरार झाले.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इतर दहशतवादी संघटनांनी सुरक्षा दलांविरोधात कारवाया वाढवल्या आहेत.