पाकिस्तानात इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार दहशतवादी सईदचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 16:15 IST2023-12-25T16:14:04+5:302023-12-25T16:15:04+5:30
हाफिज सईदचा मुलगा तलहा सईदने लाहोरमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जातेय

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार दहशतवादी सईदचा मुलगा
Imran Khan vs Hafiz Saeed Son : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेदरम्यान सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. टीव्हीनाईनच्या सुत्रांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याने लाहोरच्या सीट क्रमांक NA-122 वरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत, त्यासाठी नामांकन प्रक्रियेची मुदत शुक्रवारपर्यंत होती, मात्र उमेदवारांच्या मागणीनुसार पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आणखी दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती. नामांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. असा दावाही केला जात आहे की ही तीच जागा आहे जिथून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान स्वतः दावा करत आहेत.