अलकायदाला सोडचिठ्ठी देऊन दहशतवादी ISIS मध्ये
By admin | Published: August 10, 2014 03:40 PM2014-08-10T15:40:13+5:302014-08-10T15:40:13+5:30
अल कायदाला गळती लागली असून दहशतवादी आता अल कायदाला सोडचिठ्ठी देऊन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयामध्ये (आयएसआयएस) दाखल होत असल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. १० - हिंसक कृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणा-या अल कायदाला गळती लागली असून दहशतवादी गट आता अल कायदाला सोडचिठ्ठी देऊन इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयामध्ये (आयएसआयएस) दाखल होत असल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांकडून पाठिंबा वाढत राहिल्यास आयएसआयएस जगातील शक्तीशाली दहशतवादी संघटना बनेल अशी भिती अमेरिकेने वर्तवली आहे.
अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत अल कायदाला पाठिंबा देणा-या दहशतवादी गटांनी आता आयएसआयएसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. आयएसआयएसने इराकमधील शहर ताब्यात घेण्याचा धडाका सुरु ठेवल्यास आयएसआयएसला पाठिंबा देणा-यांमध्ये भर पडू शकते अशी भिती या अधिका-यांने वर्तवली आहे. आयएसआयएसला पाठिंबा देणा-यांचे प्रमाण वाढत राहिल्यास ही संघटना आणखी बळकट होईल व त्यातून हिंसा आणखी वाढेल असे अमेरिकेतील सुरक्षा अधिका-यांचे मत आहे. लीबीया आणि अन्य भागांमधील दहशतवादी गट ज्यांनी कधीच अल कायदाला पाठिंबा दिला नव्हता तेदेखील आता आयएसआयएसला पाठिंबा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानमधील तहरीक ए खिलाफत या दहशतवादी संघटनेने आयएसआयएसला पाठिंबा जाहीर केला होता. तहरीक ए खिलाफत ही आयएसआयएसला पाठिंबा देणारी दक्षिण आशियातील पहिली दहशतवादी संघटना होती.