दहशतवादी सलाहुद्दीनची भारताला आण्विक युद्धाची धमकी
By admin | Published: August 8, 2016 09:41 AM2016-08-08T09:41:32+5:302016-08-08T09:41:32+5:30
हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सलाहुद्दीनने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकत काश्मीर मुद्यावरुन भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. 8 - हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख सलाहुद्दीनने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीर मुद्यावरुन सलाहुद्दीनने भारताविरोधात आण्विक युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीचा खात्मा केल्यानंतर सुरु असलेला हिंसाचार सुरु राहावा यासाठी गेले काही दिवस पाकिस्तान आणि पाकिस्तानचं समर्थन मिळालेले दहशतवादी भडकाऊ वक्तव्य करत आहेत.
'काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी राजकीय, नैतिक आणि राज्यघटनेने समर्थन देण्यासाठी पाकिस्तान बांधील आहे. आणि जर पाकिस्तानने समर्थन दिलं तर दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होण्याची चांगली संधी आहे. काश्मीर मुद्द्यावरुन चौथे युद्ध होईल असा माझा अंदाज आहे. तसं झाल्यास काहीही झालं तरी तडजोड करणार नाही', असा दावा सलाहुद्दीनने केला आहे.
'पाकिस्तान किंवा जगाने पाठिंबा देवो अथवा नाही, संयुक्त राष्ट्राने त्यांचं कर्तव्य पार पाडो अथवा नाही...काश्मीरमधील जनतेने रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे सशस्त्र जिहाद हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे या निष्कर्षावर काश्मिरी जनता पोहोचली आहे', असं सलाहुद्दीन बोलला आहे.
And if Pak provides this support, there is a great chance of a nuclear war between two powers: Sayeed Salahudeen pic.twitter.com/hidotgYDOJ
— ANI (@ANI_news) August 8, 2016
'मोदी सरकार कोणतीच सूट देत नाही आहे. त्यामुळे शस्र हातात घेऊन संघर्ष करणे हाच पर्याय उरला आहे. जर जाणूनबुजून दुर्लक्ष केलं गेलं, किंवा पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं नाही..आणि भारताने त्यांचे अत्याचार सुरु ठेवले तर मोठं संकट निर्माण होऊ शकतं', असा दावा सलाहुद्दीनने केला आहे.