टेक्सासमध्ये मास्क विरोधी रॅली काढणाऱ्या कालेब वालेसचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:54 AM2021-09-02T08:54:31+5:302021-09-02T08:55:36+5:30
A Texas anti-mask organizer has died from Covid-19 : गेल्या काही दिवसांपूर्वी 30 वर्षीय कालेब वालेसला कोरोनाची लागण झाली होती.
टेक्सास : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक देशांत मास्क घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. दरम्यान, याच मास्कविरोधात चळवळ उभारणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्या या व्यक्तीचे नाव कालेब वालेस आहे. (A Texas anti-mask organizer has died from Covid-19)
गेल्या काही दिवसांपूर्वी 30 वर्षीय कालेब वालेसला कोरोनाची लागण झाली होती. जवळजवळ कालेब वालेसला एक महिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 8 ऑगस्टपासून तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना व्हायरसने ज्यावेली जगभरात थैमान घातले होते, तेव्हा अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या कालेब वालेसने मास्कविरोधी चळवळ सुरु केली.
कोरोना संकट काळात मास्क घालणे आणि सरकारने लादलेल्या इतर अनेक निर्बंधांना कालेब वालेसने तीव्र विरोध केला. त्यांनी एक संघटना स्थापन केली होती आणि त्याअंतर्गत गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या सेंट्रल टेक्सासमध्ये मास्कच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याने त्याला 'स्वातंत्र्य रॅली' असे नाव दिले. ज्याचे नेतृत्व स्वत: कालेब वालेसने केले होते. तसेच, अमेरिकेच्या सेंट्रल टेक्सासमध्ये अनेक गटांनी अशा प्रकारचे आंदोलन केले होते, यात कालेब वालेसने पुढाकार घेतला होता.
तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवतील, असे म्हटले आहे. #talibanes#Afghanistanhttps://t.co/IInEZiX5AS
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
दरम्यान, जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. करोडो लोक कोरोनामुळे बाधित झाले तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. तरीही अनेक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.