थाई लष्कर प्रमुख बनले पंतप्रधान
By admin | Published: August 26, 2014 12:24 AM2014-08-26T00:24:06+5:302014-08-26T00:24:06+5:30
थायलंडचे लष्कर प्रमुख प्रयूथ छान ओछा यांनी सोमवारी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.
Next
बँकॉक : थायलंडचे लष्कर प्रमुख प्रयूथ छान ओछा यांनी सोमवारी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.
तीन महिन्यांपूर्वी लष्करी बंडाद्वारे सत्ता हस्तगत करणारे ओछा गेल्या २२ वर्षांत पंतप्रधानपदी आरूढ होणारे पहिले विद्यमान लष्करी अधिकारी आहेत. जनरल प्रयूथ यांना सम्राट भूमिबोल अदुल्यादेज यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनीच प्रयूथ यांची देशाचे २९ वे पंतप्रधान म्हणून आज नियुक्ती केली. लष्करी मुख्यालयात आयोजित एका सोहळ्यात जनरल प्रयूथ यांना लिखित शाही आदेश सोपविण्यात आला. (वृत्तसंस्था)