थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांवर येणार चित्रपट, गुहेजवळ म्युझियमही होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:32 PM2018-07-12T14:32:19+5:302018-07-12T14:37:08+5:30

​​​​​​​बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील प्युअर फ्लीक्स स्टुडिओने तेथील मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती.

Thailand cave: Museum and film in the works for Tham Luang | थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांवर येणार चित्रपट, गुहेजवळ म्युझियमही होणार

थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांवर येणार चित्रपट, गुहेजवळ म्युझियमही होणार

Next

बँकॉक- थायलंडमधील थाम लुआंग गुहेतून 12 मुलांची सूटका करण्यात आली. अनेक दिवस त्यांना वाचवण्याची मोहीम आता संपली असली तरी थायलंड आणि जगभरात अजूनही या थरारक घटनेवर चर्चा होत आहे. आता त्या गुहेजवळच एक वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या मुलांची कशी सूटका झाली हे संग्रहालयातील फोटो आणि वस्तूंमधून दाखवण्यात येईल. या गुहेला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. आता संग्रहालयामुळे आणखी पर्यटकांना आकर्षित करता येणार आहे. त्याचप्रमाणे या बचावकार्यावर चित्रपट करण्यासाठी दोन कंपन्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 

गुहेत अडकलेले फूटबॉलपटू आता थायलंडमधील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. बचावकार्य करणाऱ्या लोकांनी या मोहिमेचे चित्रिकरण प्रसिद्ध केले आहे. या मुलांना कसे शोधण्यात आले, सर्वप्रथम ही मुले दिसल्यावर काय झाले, नौदलाच्या सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन कसे स्वागत केले जाई या सर्वाचे चित्रिकरण झाले आहे. ही गुहा थायलंड आणि म्यानमार यांच्या सीमेवर माए साई या लहानशा गावाजवळ ही गुहा आहे. हा सर्व प्रदेश केवळ पर्यटनावरच अवलंबून आहे. बचावकार्याच्या मोहिमेचे प्रमुख आणि माजी गव्हर्नर नोरोंग्साक ओसोत्तानकोर्न यांनी बचावकार्य कसे करण्यात आले याचा एक कार्यक्रम गुहेजवळ दाखवण्यात येईल असे सांगितले. यापुढे गुहेत आणि गुहेबाहेरही पर्यटकांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात येईल असे थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी स्पष्ट केले आहे.


बचावकार्य पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील प्युअर फ्लीक्स स्टुडिओने तेथील मोहिमेतील कार्यकर्त्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. या कंपनीचा सहसंस्थापक मायकल स्कॉटने या सर्व मोहिमेला पाहणं ही भावनिक घटना होती असं ट्वीट केलं आहे. प्युअर फ्लीक्सबरोबर लॉस एंजल्स येथील इवानहो पिक्चर्सही या मोहिमेवर चित्रपट काढण्यास उत्सुक आहे.

Web Title: Thailand cave: Museum and film in the works for Tham Luang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.