थायलंड : राजकीय कोंडी फोडण्यात संसद अपयशी
By admin | Published: May 17, 2014 10:46 PM2014-05-17T22:46:13+5:302014-05-17T22:46:13+5:30
घटनापीठाने पंतप्रधान यिंगलक शिनवात्र यांना पदच्युत केल्याने थायलंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे.
Next
>बँकॉक : हंगामी पंतप्रधान नियुक्त करून राजकीय कोंडी सोडविण्याचा थायलंडच्या संसदेचा (सिनेट) प्रयत्न पुरता फसला आहे.
घटनापीठाने पंतप्रधान यिंगलक शिनवात्र यांना पदच्युत केल्याने थायलंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिनवात्र यांना पदच्युत केल्यापासून सरकारविरोधी पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीने नव्याने आंदोलन छेडले आहे. नवीन सरकार स्थापन होत नाही, तोवर आंदोलन थांबविण्यात येणार नाही, असा निर्धार या समितीने केला आहे.
संसद (सिनेट) हंगामी पंतप्रधान नियुक्त करण्यास अपयशी ठरल्याने हंगामी पंतप्रधानांची कशा पद्धतीने नियुक्ती करायची, यावर आता आम्ही मार्ग शोधणार आहोत, अशी भूमिका पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म कमिटीचे नेते सुथेप थौगसुबान यांनी स्पष्ट केली.
दुसरीकडे सिनेटने हंगामी पंतप्रधानांच्या नियुक्तीबाबत आणखी विशेष अधिवेशन बोलाविण्याचे ठरविले आहे. देशांत शांतता प्रस्थापित करून राष्ट्रीय सुधारणा धोरण अमलात आणण्याचे पूर्णाधिकार पंतप्रधान आणि सरकारला देण्याची गरज आहे. दरम्यान, सरकारविरोधी आंदोलकांनी हिंसाचार थांबविला नाही, तर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशारा लष्कराने दिला आहे. नव्याने निवडणुका घेण्याची आंदोलकांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)