गुहेतील मुलांना वाचवण्याच्या मोहिमेचा नाट्यमय शेवट; थोडक्यात वाचले 20 लोकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:27 PM2018-07-12T16:27:37+5:302018-07-12T16:35:44+5:30
बचावकार्यामध्ये शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात सहभागी असलेल्या 20 लोकांचे प्राण धोक्यात आले होते. अगदी नाट्यमयरित्या या लोकांची मृत्यूच्या तावडीतून सूटका झाली आहे.
बँकॉक- थायलंडमधील गुहेमध्ये जवळपास दोन आठवडे अडकून पडलेल्या फूटबॉल खेळाडूंना बाहेर काढण्यात यश आले. मात्र आता या बचावकार्यातील एकेक थरारक गोष्टी समोर येत आहेत. या बचावकार्यामध्ये शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनेमुळे बचावकार्यात सहभागी असलेल्या 20 लोकांचे प्राण धोक्यात आले होते. अगदी नाट्यमयरित्या या लोकांची मृत्यूच्या तावडीतून सूटका झाली आहे.
Thai Navy SEALs are seen leaving Chiang Rai following the 'miracle' rescue of 12 boys and their soccer coach from a flooded Thailand cave. https://t.co/yBDoEZTCiLpic.twitter.com/n2ZH6m7jDc
— ABC News (@ABC) July 12, 2018
या गुहेमध्ये पावसामुळे सतत पाणी भरले जात होते. बचावकार्यात पाण्याचा अडथळा येऊ नये म्हणून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आले होते. मात्र सर्व मुलांना बाहेर काढण्यात आल्यानंतर दोन चेम्बर्सच्यामध्ये असलेला पंप बंद पडला. त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. ही घटना घडली असताना बचावकार्यातील सहभागी 20 लोक आतच होते. पंप बंद पडल्याचे एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्याने धोक्याची सूचना देण्यासाठी मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली. त्यामुळे आतील लोकांना धोक्याची जाणीव झाली व अगदी शेवटच्या क्षणी ते गुहेतून बाहेर पडले. गुहेतून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यापर्यंत पाणी आले होते. जर पंप वापरले नाहीत तर तुमच्याकडे ऑक्सीजन टँक असणं आवश्यक असतं. थोडाही उशिर झाला असता तर चेंबर्स पाण्याने भरले असते आणि बचावकार्यातील सहभागी लोकांना बाहेर पडता आलं नसतं.
Navy SEALs release dramatic footage of 12 boys being rescued from a cave in Thailand
— Sky News (@SkyNews) July 11, 2018
Read more: https://t.co/2mKikWVitxpic.twitter.com/YvpSw1IZRp
गुहेजवळ संग्रहालय उभारले जाणार
या गुहेजवळच एक वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या मुलांची कशी सूटका झाली हे संग्रहालयातील फोटो आणि वस्तूंमधून दाखवण्यात येईल. या गुहेला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. आता संग्रहालयामुळे आणखी पर्यटकांना आकर्षित करता येणार आहे. त्याचप्रमाणे या बचावकार्यावर चित्रपट करण्यासाठी दोन कंपन्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
गुहेत अडकलेले फूटबॉलपटू आता थायलंडमधील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. बचावकार्य करणाऱ्या लोकांनी या मोहिमेचे चित्रिकरण प्रसिद्ध केले आहे. या मुलांना कसे शोधण्यात आले, सर्वप्रथम ही मुले दिसल्यावर काय झाले, नौदलाच्या सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन कसे स्वागत केले जाई या सर्वाचे चित्रिकरण झाले आहे. ही गुहा थायलंड आणि म्यानमार यांच्या सीमेवर माए साई या लहानशा गावाजवळ ही गुहा आहे. हा सर्व प्रदेश केवळ पर्यटनावरच अवलंबून आहे. बचावकार्याच्या मोहिमेचे प्रमुख आणि माजी गव्हर्नर नोरोंग्साक ओसोत्तानकोर्न यांनी बचावकार्य कसे करण्यात आले याचा एक कार्यक्रम गुहेजवळ दाखवण्यात येईल असे सांगितले. यापुढे गुहेत आणि गुहेबाहेरही पर्यटकांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात येईल असे थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी स्पष्ट केले आहे.