फेसबुकवर आई-मुलांच्या संवादात थायलंड अव्वल

By admin | Published: May 10, 2015 11:27 PM2015-05-10T23:27:22+5:302015-05-10T23:27:22+5:30

गेल्या काही वर्षांत सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. मित्रत्वासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते.

Thailand tops in I-child interaction on Facebook | फेसबुकवर आई-मुलांच्या संवादात थायलंड अव्वल

फेसबुकवर आई-मुलांच्या संवादात थायलंड अव्वल

Next

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. मित्रत्वासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते. अमेरिका व भारत या देशांत फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. मात्र, इंटरनेटच्या माध्यमातून सामाजिक संवाद सुविधाजनक बनविण्यासाठी या सोशल साईटवर आई-मुलांतील संवादाच्या दृष्टीने थायलंड अव्वलस्थानी आहे.
फेसबुकचा जगभरात वापर करणाऱ्यांची संख्या १.४ अब्जापर्यंत पोहोचली आहे. यामध्ये स्वत:ची ओळख आई म्हणून करून देणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८ कोटी एवढे आहे.
फेसबुकने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘सोशल साईटच्या मदतीने आई व मुले यांच्यात थायलंडमध्ये सर्वाधिक संवाद होतो. यानंतर इजिप्त, ब्रिटन, आॅस्ट्रेलिया व मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. या खालोखाल अमेरिका, फ्रान्स, व्हिएतनाम, ब्राझील व इटली यांचे स्थान आहे.’
अमेरिकेनंतर फेसबुकचा वापर करणाऱ्यांत भारताचा क्रमांक लागतो. भारतात ११.२ कोटी फेसबुकचे वापरकर्ते आहेत. मात्र, फेसबुकच्या मदतीने आई-मुलांतील संवादाच्या दृष्टीने प्रमुख १० देशांत भारताचा समावेश नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Thailand tops in I-child interaction on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.