जेवण करता करता ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं, १०० रुपयांत झाला कोट्यवधींचा मालक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 01:24 PM2021-02-17T13:24:25+5:302021-02-17T13:24:54+5:30
truck driver finds rare orange pearl: कुणाचं नशीब केव्हा पालटेल काही सांगता येत नाही. थायलंडमधील ट्रक ड्रायव्हरसोबत काहीसं असंच झालं आहे.
कुणाचं नशीब केव्हा पालटेल काही सांगता येत नाही. थायलंडमधील ट्रक ड्रायव्हरसोबत काहीसं असंच झालं आहे. एक ट्रक ड्रायव्हर आपल्या पत्नीसोबत जेवत होता. पण जेवण संपता संपता त्याच्या हाती अशी एक गोष्ट आली की ज्यानं ट्रक ड्रायव्हरचं नशीबच पालटलं. ट्रक ड्रायव्हरच्या हाती एक नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती सापडला. नुकतंच असाच एक मोती एका शेतकऱ्याला देखील मिळाला होता आणि त्याची किंमत तब्बल २.५ कोटी इतकी होती. (truck driver finds rare orange pearl)
नेमकं काय घडलं?
थायलंडच्या चोनबुरी प्रांतात ही घटना घडली. मोनथियान जानसुक नावाचा एक ट्रक ड्रायव्हर आपल्या पत्नीसोबत जेवत होता. जेवणात लँड स्नेलचा (गोगलगाय) बेत होता. जो मार्केटमधून फक्त १०० रुपयांना खरेदी केला होता. या गोगलगायच्या आतमध्ये त्यांना नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती सापडला. तो काही साधासुधा मोती नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याचं नशिबच पालटलं.
कोट्यवधींच्या किमतीचा मोती
मोती मिळाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर खूप खूष झाला. मोती सापडल्याचं जसं शेजाऱ्यांना कळालं तसं परिसरातून अनेक लोक मोती पाहण्यासाठी घरी जमा झाल्याचं ट्रक ड्रायव्हरने सांगितलं. नारंगी रंगाचा मोती थायलंडमध्ये अतिशय दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे या मोतीची किंमती कोट्यवधींमध्ये असण्याची शक्यता आहे.