एकाच रिलेशनशिपमध्ये होते पती, पत्नी आणि 'ती', चौथ्याची झाली एन्ट्री अन्...! VIDEO कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:12 PM2022-04-09T12:12:55+5:302022-04-09T12:13:56+5:30
व्हिडिओमध्ये ती रागाच्या भरात तलवारीने वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे...
पती-पत्नी आणि आणखी एक महिला, यांच्यात अफेअर सुरू होते. तिघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, एक दिवस पती-पत्नीने महिलेसोबतचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रचंड संतापलेली ती महिला तलवारी घेऊन थेट पती-पत्नीच्या घरी पोहोचली. तीने त्यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्नही केला. ही संपूर्ण घटना घरातील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही घटना थायलंडमधील आहे. येथे 40 वर्षीय अउम, एअर (35) आणि त्यांची पत्नी नोट (38) रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या वर्षी अउमने तिच्या एका बॉयफ्रेंडलाही या नात्यात सामील करण्याचाचा आग्रह केला. मात्र, याला जोडप्याने नाकार दिला आणि अउमलाही त्यांच्या नात्यापासून दूर केले.
'डेली मेल'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, पती-पत्नी (एअर आणि नोट) यांनी दावा केला आहे, की 40 वर्षीय अउम त्यांना यासाठी सातत्याने त्रास देत आहे. मात्र, त्यांनी असे करण्यास नकार दिला आहे. यामुळे संतापलेली अउम गेल्या आठवड्यात तलवार घेऊन त्यांच्या घरावर चालून आली. याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये ती रागाच्या भरात तलवारीने वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सुदैवाने दाम्पत्याने दरवाजाच्या आड लपून स्वत:ला वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. तसेच आतापर्यंत आपण बदनामीच्या भीतीने महिलेकडे दुर्लक्ष करत होतो, पण आता आपण पोलिसांत तक्रार करणार आहोत, असे या जोडप्याने म्हटले आहे.