VIDEO : ३२व्या मजल्यावर खिडकीची दुरूस्ती करत होते वर्कर्स, रागावलेल्या महिलेने कापला दोर आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:20 PM2021-10-28T12:20:28+5:302021-10-28T12:25:31+5:30

Thailand : पोर्ट्सनुसार, जेव्हा महिलेने वर्कर्सना तिच्या रूमच्या बाहेर पाहिलं तर ती फ्रस्ट्रेड झाली. महिलेला सांगण्यात आलं नव्हतं की, ते १२ ऑक्टोबरला काम करतील.

Thailand : Workers were repairing the window on the 32nd floor angry woman cut the rope | VIDEO : ३२व्या मजल्यावर खिडकीची दुरूस्ती करत होते वर्कर्स, रागावलेल्या महिलेने कापला दोर आणि...

VIDEO : ३२व्या मजल्यावर खिडकीची दुरूस्ती करत होते वर्कर्स, रागावलेल्या महिलेने कापला दोर आणि...

Next

थायलॅंडमधून (Thailand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या महिलेने रागात बिल्डींगच्या बाहेर लटकलेल्या दोन पेंटरच्या झुल्याचा दोर कापला कारण त्यांनी सांगितलं नाही की, ते त्या दिवशी काम करणार आहेत. इतकंच नाही तर महिलेने त्यांना २६व्या मजल्यावर लटकलेलं सोडलं. ही घटना बुधवारी घडली.

थाई राजधानीच्या उत्तरेत पाक क्रेट पोलीस स्टेशनचे प्रमुख कर्नल पोंगजॅक प्रीचाकरूनपोंगने द एसोसिएटेड प्रेसला सांगितलं की, महिलेवर हत्येचा प्रयत्न आणि संपत्ती नष्ट करण्याचा आरोप आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की, महिलेने दोरी कोणत्या कारणाने कापली. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा महिलेने वर्कर्सना तिच्या रूमच्या बाहेर पाहिलं तर ती फ्रस्ट्रेड झाली. महिलेला सांगण्यात आलं नव्हतं की, ते १२ ऑक्टोबरला काम करतील.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दोराला लटकलेले दोन पेंटर्सना २६व्या मजल्यावरील रहिवाश्यांकडून खिडकी उघडण्यास आणि त्यांना आत येण्यास सांगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. म्यांमारला राहणाऱ्या पेंटर सॉन्गने थाई मीडियाला सांगितलं की, तो आणि त्याचा मित्र ३२व्या मजल्यावर इमारतीत पडलेल्या भेगांची दुरूस्ती करण्यासाठी आले होते.
 

Web Title: Thailand : Workers were repairing the window on the 32nd floor angry woman cut the rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.