टेलिग्रामच्या सीईओला अटक, अटकेमागे गर्लफ्रेंडचा हात? नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:10 PM2024-08-26T16:10:29+5:302024-08-26T16:21:14+5:30
टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांना पॅरिसच्या बाहेर बोर्गेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
रशियन वंशाचे टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांना शनिवारी रात्री उशिरा अझरबैजानहून खासगी जेटने पॅरिसच्या ले बोर्जेट विमानतळावर उतरल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांची गर्लफ्रेंड समजली जाणारी युलिया वाव्हिलोव्हा हिलाही अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पावेल दुरोवच्या अटकेनंतर त्यांनी कोणीही संपर्क केलेला नाही. त्यांच्या अटकेमागे त्यांच्या गर्लफ्रेंडचा हात असू शकतो.
टेलिग्रामने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अटकेचा कोणताही तपशील दिलेला नाही. टेलिग्राम म्हणाले की, कंपनी EU कायद्यांचे पालन करत आहे आणि तिचे नियंत्रण "उद्योग मानकांनुसार आणि सतत सुधारत आहे.
निवडणुका काश्मीरमध्ये पण मतदान दिल्लीत? कोणाला मिळते विशेष सुविधा; पाहा, नेमके कारण
कंपनीने सांगितले की, टेलीग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि ते वारंवार युरोपला जातात. त्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापराला प्लॅटफॉर्म किंवा त्याचा मालक जबाबदार असल्याचा दावा करणे मूर्खपणाचे आहे. आम्ही या परिस्थितीचे लवकर निराकरण होण्याची अपेक्षा करतो. टेलिग्राम तुम्हा सर्वांसोबत आहे, असंही यात म्हटले आहे.
युलिया वाविलोवा अनेकवेळा पावेल दुरोव सोबत दिसली आहे आणि पॅरिसला आल्यावर खासगी जेटवर देखील सोबत होती. त्यांनी यापूर्वी पावेल डुरोव्हच्या जेटमधून इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट केल्या आहेत आणि पॅरिसमध्ये एकत्र असताना त्यांचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव हे तंत्रज्ञान जगतातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५.५ अब्ज डॉलर इतकी आहे. यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये १२० व्या क्रमांकावर आहेत.
युलिया वाविलोवा कोण आहे?
२४ वर्षीय युलिया वाविलोवा ही दुबईची क्रिप्टो कोच आणि स्ट्रीमर आहे. इंस्टाग्रामवर, २०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या वाविलोवा स्वतःला गेमर म्हणते. वाविलोवा आणि टेलिग्राम सीईओ कझाकस्तान, किर्गिझस्तान आणि अझरबैजान सारख्या विविध ठिकाणी एकत्र दिसले आहेत, त्यांचे फोटोही Instagram स्टोरी आणि हायलाइट्सवर आहेत.