अद्भूत, अदम्य! बुलेट ट्रेनचा मार्ग बदलला नाही, तर मार्गात आलेले अख्खे बसस्थानकच हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:42 IST2025-01-08T14:42:08+5:302025-01-08T14:42:32+5:30

चिनी अभियंत्याचा तंत्रज्ञानातील करिश्मा; ३० हजार टनाचे बस टर्मिनल ९४५ फूट सरकविले; गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये नाेंद

The bullet train route was not changed, but all the bus stops along the route were moved. | अद्भूत, अदम्य! बुलेट ट्रेनचा मार्ग बदलला नाही, तर मार्गात आलेले अख्खे बसस्थानकच हलविले

अद्भूत, अदम्य! बुलेट ट्रेनचा मार्ग बदलला नाही, तर मार्गात आलेले अख्खे बसस्थानकच हलविले

बीजिंग: सहा वर्षांपूर्वी काेराेना आणि आता ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गामुळे चर्चेत असलेले चीन यावेळी तंत्रज्ञानाच्या अदम्य गाेष्टीसाठी चर्चेत आहे. एखाद्या रेल्वे मार्गात जर काेणतीही माेठी स्थावर इमारत असेल, तर एकतर ती इमारत पाडली जाते किंवा रेल्वेचा मार्ग बदलला जाताे. मात्र, चीनच्या ‘झियामेन’ शहरात बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गात अडथळा निर्माण करणारे अख्खे ५ माळ्याचे व ३० हजार टन वजनाची बस स्टेशनची इमारत दुसऱ्या स्थानी ढकलून हलविण्यात आली. ही अद्भूत, अदम्य अशी कामगिरी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंदविण्यात आली आहे. अख्खी बस स्टेशनची इमारत सरकविण्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

या स्टेशनविषयी आधी जाणून घ्या... 

  • हे बस टर्मिनल २०१५मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले हाेते. दाेन मजले जमिनीखाली व तीन  वर असे ५ मजली टर्मिनल आहे.
  • त्यावेळी २६० युआन म्हणजे ३० दशलक्ष पौंड खर्च करून ५ वर्षात या स्टेशनचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे वजन ३०,००० टन म्हणजे १५० बाेइंग विमानाएवढे आहे. स्टेशन ५३१ फूट लांब व ११० फूट रूंद आहे.


१० दशलक्ष डाॅलर वाचले

  • इमारत ढकलण्यासाठी राेलिंग टॅक लावण्यात आले.
  • हायड्राेलिक जॅक दरराेज १० ते २० मीटर इमारत पुढे सरकवित हाेते.
  • ४० दिवसाच्या कामानंतर ही अख्खी इमारत ९० अंशाच्या काटकाेनात ९४५ फूट सरकविण्यात आली व बुलेट ट्रेनचा मार्ग प्रशस्त करण्यात आला.
  • अशा प्रकारे टर्मिनल हलविल्यामुळे वेळ वाचला आणि जवळपास १० दशलक्ष डाॅलर वाचविण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.


कसे हलविले अख्खे टर्मिनल?

शहराच्या नवीनतम वाहतूक योजनेअंतर्गत हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्प प्रस्तावित हाेता. मात्र, ट्रेनच्या मार्गात हे टर्मिनल आडवे येत हाेते. टर्मिनल पाडावे की हलवावे, अशा अनेक तासांच्या चर्चेनंतर ते हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • खरतर एवढी जड आणि मोठी इमारत त्वरित हलवणे हे अभूतपूर्व आव्हान आहे. मात्र, चिनी अभियंत्यांनी ते स्वीकारले.
  • इमारतीच्या एका बाजुला मध्यबिंदू मानून ते ९० अंशाच्या काटकाेनात हलविणे आवश्यक हाेते.
  • त्यासाठी कामगारांनी आधी इमारतीच्या ‘पाया’पासूनची माती खाेदून काढली. अशाच प्रकारे ज्या नवीन ठिकाणी हलवायचे हाेते, तेथीलही माती खाेदून काढली.
  • पंख्याच्या आकाराच्या भागात जमिनीच्या बाजूने रेलिंगदेखील लावले. मग त्यांनी इमारत जमिनीवरून उचलली आणि खाली ५३२ हायड्रॉलिक जॅक लावले.
  • हे विशेष हायड्रॉलिक जॅक आहेत जे संरचना वर ढकलल्यानंतर आपोआप पुढे जाऊ शकतात.
  • हायड्रॉलिक जॅक दोन गटांमध्ये विभागले गेले होते. पहिला गट वर उठेल व पुढे जाईल आणि दुसरा गट त्याच हालचालींची पुनरावृत्ती करण्यापूर्वी खाली जाईल. यामुळे इमारत 'चालत' असल्याचा दृश्य भ्रम निर्माण होईल. या सर्व हालचाली संगणकाद्वारे नियंत्रित करण्यात आल्या.

 

Web Title: The bullet train route was not changed, but all the bus stops along the route were moved.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.