Borneo New Capital: समुद्रात बुडतेय या बड्या मुस्लीम देशाची राजधानी! राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:31 PM2023-03-10T16:31:17+5:302023-03-10T16:32:15+5:30
महत्वाचे म्हणजे, बुडणाऱ्या जकार्ता शहरात जवळपास 1 कोटी लोक राहतात.
इंडोनेशिया (Indonesia) या मोठ्या मुस्लीम देशाची राजधानी जकार्ता (Jakarta) झपाट्याने जावा सागरात बुडत चालली आहे. यातच, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांनी राजधानी बोर्नियो (Borneo) येथे शिफ्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एका अंदाजानुसार, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता 2050 पर्यंत जवळपास एक तृतीयांश पाण्याखाली जाईल.
वाढती लोकसंख्या, प्रदूषण, भूकंपाचे क्षेत्र अशा बुडत चाललेल्या जकार्ताला लोक सोडून जात आहेत. यातच इंडोनेशियाने नवी राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाची ही नवी राजधानी बोर्नियोमध्ये असेल. 256 हजार हेक्टर एवढ्या प्रचंड मोठ्या भूभागावर इंडोनेशिया नवी राजधानी वसेल. बोर्नियोतील इन्फ्रास्ट्रक्चर अत्याधुनिक असेल. येथे सर्व प्रकारच्या मॉर्डन सुख-सुविधांची व्यवस्था असेल.
यातील मोठे आव्हान म्हणजे, ज्या ठिकाणी नवी राजधानी वसवली जात आहे, तो जंगली भाग आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी समान आणि वन्य प्राणी राहतात. ही राजधानी वसवताना झाडांची मोठी कत्तल होईल. यामुळे आदीवासी समाज आणि प्राण्यांना पलायन करावे लागेल.
महत्वाचे म्हणजे, बुडणाऱ्या जकार्ता शहरात जवळपास 1 कोटी लोक राहतात. शहर बुडण्यामागील मुख्य कारण, भूगर्भातून मोठ्या प्रमाणावर येणारे पाणी असल्याचे बोलले जात आहे. तसेच दुसरीकडे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जावा समुद्राची पाणी पातळी सातत्याने वाढत चालली आहे.