जगातील सर्वात स्वस्त घरे! 99 रुपयांत मिळतेय हक्काचे 2,4BHK घर; जाणून घ्या या योजनेबदद्ल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:26 PM2023-02-13T15:26:39+5:302023-02-13T15:27:01+5:30
अनेकजण स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्ची घालतात किंवा आयुष्यभर हप्ते भरत राहतात. परंतू जर तुमच्याकडच्या काही रुपयांत अख्खे घर खरेदी करता आले तर... अशी एक स्कीम आहे, ज्याद्वारे ९९ रुपयांत घर खरेदी करता येते.
जगातील सर्वात स्वस्त घर कोणते असेल? महागड्या घरांबद्दल तर सारेच बोलतात, पण जर स्वस्तात काही मिळत असेल तर आधी आपण उड्या मारतात आणि सांगतही नाहीत. असा अनुभव प्रत्येकाला येतच असेल. कधीतरी आपणही तसे वागलेले असू देखील. परंतू, जगातील सर्वात स्वस्त घर 99.67 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे, असे कोणी सांगितले तर... विश्वास तरी बसेल का?
अनेकजण स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्ची घालतात किंवा आयुष्यभर हप्ते भरत राहतात. परंतू जर तुमच्याकडच्या काही रुपयांत अख्खे घर खरेदी करता आले तर... अशी एक स्कीम आहे, ज्याद्वारे ९९ रुपयांत घर खरेदी करता येते.
हेल्प टू बाय स्कीम (Help to Buy Scheme) नुसार वॉल्वरहैम्प्टनमध्ये १०० रुपयांच्या आत घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे. वन्नाबी नावाच्या व्यक्तीने या योजनेबाबत सांगितले आहे. त्यालाही या योजनेतून घर मिळाले आहे. हेल्प टू बाय स्कीम अंतर्गत इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्समधील वॉल्व्हरहॅम्प्टन शहरात दोन, तीन आणि चार बेडरुमची घरे विकली जात आहेत. ही घरे रहिवाशांना 25 वर्षांसाठी भाड्याने घेतल्यानंतर खरेदी करण्याची परवानगी देतात.
या योजनेअंतर्गत लॉयल्टी प्रीमियम काढला जातो. यानंतर ते घर फक्त रु ९९.६७ (£१) मध्ये खरेदी करता येते. या योजनेत 100 घरे आहेत. योजना सुरू केल्यापासून २० वर्षांच्या आत बाहेर पडल्यावर, भाडेकरू त्यांचा प्रीमियम रोख स्वरूपात घेऊ शकतात. कन्स्ट्रक्शन कंपनी विल्मोट डिक्सन 266 घरे बांधत आहे.