भारतासोबतचा पंगा महागात पडला,कॅनडाच्या ट्रुडोंचं आधी पंतप्रधान पद गेलं, आता राजकारणातून निवृत्ती घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:42 IST2025-01-16T18:37:22+5:302025-01-16T18:42:11+5:30
कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसापूर्वी भारताविरोधात आरोप केले होते.

भारतासोबतचा पंगा महागात पडला,कॅनडाच्या ट्रुडोंचं आधी पंतप्रधान पद गेलं, आता राजकारणातून निवृत्ती घेणार
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावरुन दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. दरम्यान, आता भारताविरोधात आरोप करणे जस्टिन ट्रुडो यांना महागात पडल्याचे दिसत आहे. पक्षाने नेता निवडल्यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांनी अलीकडेच कॅनडाचे पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
'भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा आवश्यक', काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
ट्रुडो म्हणाले की, ते कॅनडातील आगामी सार्वत्रिक निवडणुका लढवणार नाहीत आणि राजकारणही सोडू शकतात, हा निःसंशयपणे ट्रुडोंच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय आहे.
"पंतप्रधान ट्रुडो येत्या निवडणुकीत उभे राहणार नाहीत," असा दावा कॅनडाच्या ग्लोबल न्यूजने केला. ट्रुडो म्हणाले, "मला माहित नाही की मी पुढे काय करेन, खरे सांगायचे तर, माझ्याकडे त्याबद्दल विचार करण्यासाठी जास्त वेळ नाही, मी ते काम करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे." "मी एका असाधारण महत्त्वाच्या वेळी कॅनेडियन लोकांनी मला जे करण्यासाठी निवडले आहे ते मी करत आहे, असंही ते म्हणाले.
जस्टिन ट्रुडो यांनी अमेरिकेतील कॅनेडियन प्रांतांचे पंतप्रधान, राजदूत आणि काही संघीय कॅबिनेट मंत्र्यांचीही भेट घेतली. नवनिर्वाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी समन्वय स्थापित करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
"या देशात नेहमीच खूप राजकारण चालू असते, परंतु कॅनडाच्या राष्ट्रीय हितासाठी कधी काम करायचे हे जाणून घेणे आणि कॅनेडियन लोकांना काय पहायचे आहे हे जाणून घेणे, प्रत्येकासाठी खरोखरच एक श्रेय आहे,असंही ट्रुडो म्हणाले.
ऑगस्टमध्ये कॅनडामध्ये निवडणुका होणार
जस्टिन ट्रुडो यांनी अलीकडेच त्यांच्या लिबरल पार्टी ऑफ कॅनडाने नेते म्हणून निवड केल्यानंतर ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी कॅनडाचे पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली होती. ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि निवडणुका होईपर्यंत काही महिने ते संसदेचे सदस्य राहतील. बँक ऑफ कॅनडाचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी ट्रुडो यांची जागा घेण्याच्या शर्यतीत येऊ शकतात.