जिवंत व्यक्तीला दफन करण्याची तयारी करत होते कुटुंबीय, सुरू होती अशी चर्चा, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 01:06 PM2023-02-03T13:06:10+5:302023-02-03T13:12:17+5:30
Family News: व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुटुंबीय कुटुंबातीत एका वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत बोलताना दिसत आहे.
आजच्या काळात काही अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या पाहिल्यावर लोकांमधून भावना संपुष्टात येत आहेत की, काय असं वाटू लागतं. आता अशीच एक गोष्ट समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच तो व्हिडीओ पाहिल्यावर लोकांचे अश्रू अनावर होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंबीय कुटुंबातीत एका वृद्ध व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत बोलताना दिसत आहे. घरातील आजारी असलेल्या एका वृद्धाचं दफन करण्याबाबत या कुटुंबामध्ये चर्चा सुरू होती. तर हा वृद्ध खिन्नपणे तिथेच बसून ते बोलणं ऐकत होता.
ही घटना चीनमधील अनहुई प्रांतामधील आहे. हा व्हिडीओ या वृद्दाच्या नातीने शेअर केला आहे. ति म्हणते की, माझ्या आजोबांना गेल्या वर्षी कर्करोग झाला होता. मात्र केमोथेरेपीच्या दोन फेऱ्यांनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र तरीही संपूर्ण कुटुंब आजोबांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोळा झाले आहे. दफनभूमी कुठे निवडावी, याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सर्व सुरू असताना हे आजोबा तिथेच बसून होते. तर त्यांच्यासमोरच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय करायचं याची चर्चा कुटुंबीयांमध्ये सुरू होती.
हे आजोबा घरात मान खाली घालून एके ठिकाणी बसलेले होते. त्यांच्या हातात टिश्शू पेपर होता. त्यांची नात सांगते की, तिचे आजोबा ऐकू शकत नाहीत. या चर्चेदरम्यान, त्यांनी आपल्या कानातील मशीनही घातलेली नव्हती. आजोबांनी कदाचित हे बोलणं ऐकलं नसावं, याचा मला आनंद आहे. आजोबा लवकरच कर्करोगमुक्त होतील, अशी मला अपेक्षा आहे. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला रडू कोसळलंय, असं अनेकांनी म्हटलं आहे.