मुलगी समजत होती पोटदुखी, टॉयलेटमध्ये अचानक झाला बाळाचा जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:40 PM2022-07-21T13:40:01+5:302022-07-21T13:40:55+5:30
ब्रिटनमधील Bristol मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय लुसी जोन्सने म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी आपण केलेली प्रेग्नन्सी टेस्टदेखील निगेटिव्ह आली होती.
ब्रिटनमधील एका एअरहोस्टेसने अचानकपणे टॉयलेटमध्ये मुलीचा जन्म झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. लुसी जोन्स (Lucy Jones) असे या ट्रेनी एअरहोस्टेसचे नाव आहे. आपण टॉयलेटला गेलो, तेव्हाच आपल्याला प्रेग्नन्सीसंदर्भात माहिती मिळाली, असे तिने म्हटले आहे. एढेच नाही, तर आपण Contraceptive pills घेत होतो, असा दावाही लुसीने केला आहे. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वीच तिला एअरलाइन्सच्या तपासणीत फिट टू फ्लाय घोषित करण्यात आले होते.
ब्रिटनमधील Bristol मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय लुसी जोन्सने म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी आपण केलेली प्रेग्नन्सी टेस्टदेखील निगेटिव्ह आली होती. तिने गेल्या महिन्यात बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे तिला स्वतःलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण तिला कसल्याही प्रकारचे प्रेग्नन्सीची लक्षणे नव्हती. एवढेच नाही, तर तिने गर्भनिरोधकही वापरले होते. याशिवाय आपण प्रेग्नन्सी दरम्यान जवळपास 10-15 वेळा क्लबलाही गेली होती, दारूही प्यालो होतो, अनेक पार्ट्यांमधेही गेलो होती, असा दावाही तिने केला आहे.
एका वृत्त संस्थेशी बोलतान लुसी जोन्स म्हणाली, ' मी जेव्हा बाथरूममध्ये बाळाला पाहिले, तेव्हा मला मी मी प्रेग्नन्ट असल्याचे समजले. खरे तर मी बेडवर होते, त्यावेळी मला अचानकपणे पोटात त्रास होऊ लागला. त्यावेळी मला टॉयलेटला जावेसे वाटले. मी लगेच टॉयलेटला गेले आणि तेथेच मुलीला जन्म दिला. यानंतर तत्काळ एम्ब्युलन्सला कॉल केला. कारण मी घरी एकटीच होते. सध्या लुसीची मुलगी Ruby बिल्कुल फिट आहे ती 4 महिन्यांची झाली आहे.