मंदिरासाठी उद्योगजक भाविकाने दिले तब्बल २५४ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 08:35 IST2023-04-27T08:35:08+5:302023-04-27T08:35:34+5:30
फिननेस्ट ग्रुपचे संस्थापक पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन कार हे प्रकल्पासाठी प्रमुख देणगीदार आहेत.

मंदिरासाठी उद्योगजक भाविकाने दिले तब्बल २५४ कोटी रुपये
लंडन : ब्रिटनस्थित एक सेवाभावी संस्था लंडनमध्ये पहिले भगवान जगन्नाथ मंदिर बांधण्याची योजना आखत आहे. त्यांच्या योजनेला पाठिंबा देत, मूळ ओडिशातील एका उद्योजकाने सुमारे २५४ कोटी रुपये दिले आहेत. मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
फिननेस्ट ग्रुपचे संस्थापक पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन कार हे प्रकल्पासाठी प्रमुख देणगीदार आहेत. पटनायक यांनी लंडनमधील भगवान जगन्नाथ यांना समर्पित भव्य मंदिराच्या बांधकामासाठी २५ दशलक्ष पौंड देण्याचा संकल्प केला आहे.