सर्वाधिक काळ राज्य करणारी थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ; ब्रिटनमध्ये आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 10:44 AM2022-06-04T10:44:15+5:302022-06-04T10:45:01+5:30
साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही, अशी ज्या देशाची ख्याती होती त्या थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ आता ९६ वर्षांची आहे.
साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही, अशी ज्या देशाची ख्याती होती त्या थोर ब्रिटनची राणी एलिझाबेथ आता ९६ वर्षांची आहे. १९५२ मध्ये एलिझाबेथ यांच्या पिताश्रींचे निधन झाले. त्यानंतर राणीपद त्यांच्याकडे चालत आले. तेव्हापासून आजतागायत एलिझाबेथ ब्रिटनच्या राणीपदी आहेत.
ब्रिटनमध्ये आनंदोत्सव
राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीला २ जून रोजी ६९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बकिंगहॅम पॅलेस येथे राणीसाठी मानवंदना तसेच फ्लाय पास्ट आयोजित करण्यात आले होते. यावेळी राजवाड्याच्या बाल्कनीमध्ये राणी आणि संपूर्ण परिवार पारंपरिक पोषाखात उपस्थित होता. राणीच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ६९व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनमध्ये ३००० ठिकाणी दीप महोत्सव आयोजित करण्यात आला.
राज्याभिषेक कधी?
सर्वाधिक काळ राणीपदी राहण्याचा मान एलिझाबेथ यांना जातो. १९५३ मध्ये एलिझाबेथ यांचा राणीपदी राज्याभिषेक झाला होता. पुढील वर्षी एलिझाबेथ यांच्या राणीपदाला ७० वर्षे पूर्ण होतील.
राणीचा उत्तराधिकारी कोण?
राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स चार्ल्स हे उत्तराधिकारी असतील. एलिझाबेथ यांचे पती फिलीप यांचे गेल्या वर्षी निधन झाले.
राजघराण्याच्या नियमामुळे फिलीप हे ब्रिटनचे राजे होऊ शकले नाहीत. २०२६ मध्ये एलिझाबेथ यांच्या शतकपूर्तीनिमित् ब्रिटनमध्ये भव्य सोहळा आयोजित केला जाईल. त्यावेळी एलिझाबेथ त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड जाहीर होईल.