ड्रॅगनची चाल...! लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावर बांधला पूल, भारतासाठी धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:31 AM2024-07-23T11:31:16+5:302024-07-23T11:33:03+5:30
तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता.
चीनने पँगॉन्ग त्सो सरोवरावर पुल तयार केला आहे. याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. सॅटेलाइटच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंमधून याचा खुलासा झाला आहे. फोटोंमध्ये हा पूल स्पष्टपणे दिसत आहे. हा पूल लडाखमधील खुर्नाक भागात तलावाच्या सर्वात अरुंद भागात तयार करण्यात आला आहे. हा पूल लडाखच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडतो. याच महिन्यात पुलाचे काम पूर्ण झाल्याचेही या सॅटेलाइट फोटोंवरून स्पष्ट होते. यामुळे आता चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या हालचाली सोप्या होतील.
तत्पूर्वी, वर्ष 2022 मध्ये, चिनी सेनिक पँगॉन्ग त्सो सरोवराच्या सर्वात अरुंद भागात एका पुलाचे काम करत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर हा सर्व्हिस पूल असल्याचे समोर आले होते. ज्याचा वापर एका मोठ्या पुलाच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता.
लष्करी टँकसह जाणेही शक्य -
डेमियन सायमन यांनी आपल्या X हँडलवर या पुलाचे नवे फोटो शेअर करत, फोटोवरून नवा पूल तयार झाला असल्याचे संकेत मिळतात, असे म्हटले आहे. पुलाच्या पृष्ठभागावर नुकतेच डांबर पसरवण्यात आले आहे. हा पूल या भागातील चिनी सैनिकांची गतिशीलता वाढवेल. याच्या सहाय्याने सरोवराच्या भागातील भारतीय ठिकानांपर्यंत सहजपणे पोहोचता येऊ शकेल. या पुलावरून चिनी सैनिक टँकसह जाऊ शकतील. यामुळे त्यांचे रेजांग ला सारख्या दक्षिणेकडील भागात जाणेही सोपे होईल. याच भागात 2020 मध्ये भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते.
काय होणार परिणाम? -
या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता चीन आपले सैनिक आणि युद्धसाहित्य पँगॉन्ग सरोवराच्या भागात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. लडाखमध्येही विस्तारची त्याची योजना दिसत आहे. अशा परिस्थितीत चीन आपली आर्मी आणि शस्त्रास्त्रे तक्षिण भागात पोहोचवून काही ऑपरेशनच्या तयारीतही असू शकतो. कारण या पुलामुळे चीनला लडाखच्या दक्षिण भागात जाण्यासाठी 180 किलोमीटर फिरून यावे लागणार नाही.