पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 06:58 PM2024-09-07T18:58:47+5:302024-09-07T18:58:53+5:30
'द मिसिंग थर्ड ऑफ पाकिस्तान' या रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. २०२३ च्या जनगणनेनुसार हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
शेजारचा देश पाकिस्तान कंगाल झालेला आहे. दहशतवादावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याने विकास खुंटला आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही तेथील शिक्षण व्यवस्था विदीर्ण अवस्थेत आहे. याचा परिणाम असा की पाकिस्तानात ५ ते १६ वर्षांची जवळपास २.५३ कोटी मुले शाळेतच जात नाहीत.
पाकिस्तानची ही हालत ग्रामीण भागात अधिक आहे. 'द मिसिंग थर्ड ऑफ पाकिस्तान' या रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. २०२३ च्या जनगणनेनुसार हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
यापैकी अधिकतर म्हणजेच ७४ टक्के मुले ही ग्रामीण भागात राहत आहेत. या भागात शाळाच नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचबरोबर शाळा असली तरी गरीबी या मुलांच्या आड येत आहे. शिक्षणातील ग्रामीण-शहरी अंतर वाढत जात आहे. अंदाजे 18.8 दशलक्ष शाळाबाह्य मुले ग्रामीण भागात राहतात. 5 ते 9 वयोगटातील मुलांपैकी 51 टक्के मुले कधीही शाळेत गेलेली नाहीत. तर ५० टक्के मुलांनी अभ्यास सोडला आहे.
5 ते 16 वयोगटातील 80 टक्के मुली कधीही शाळेत गेलेल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रवेशामध्ये खोलवर रुजलेली लैंगिक असमानता दिसून येते. कराची आणि लाहोर सारख्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुले आहेत.