अमेरिकेत पुन्हा 9/11 चा थरार; विमानाच्या पाच तास घिरट्या; ‘वॉलमार्ट’ उडवण्याची दिली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 08:12 AM2022-09-04T08:12:28+5:302022-09-04T08:19:26+5:30

वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

The of 9/11 in America again; Five hours of flight; A threat was given to blow up 'Walmart' | अमेरिकेत पुन्हा 9/11 चा थरार; विमानाच्या पाच तास घिरट्या; ‘वॉलमार्ट’ उडवण्याची दिली होती धमकी

अमेरिकेत पुन्हा 9/11 चा थरार; विमानाच्या पाच तास घिरट्या; ‘वॉलमार्ट’ उडवण्याची दिली होती धमकी

Next

 

मिसिसिपी : वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टि्वन टॉवर विमानांनी उडवल्याची आठवण करून देणारी आणि त्यातून संपूर्ण अमेरिकेची झोप उडवणारी घटना पुन्हा एकदा घडली. मिसिसिपी राज्यातील तुपेलो शहरात एका व्यक्तीने नऊ आसनी विमानाचे अपहरण करून ते तब्बल पाच तास हवेत घिरट्या घालत ठेवले. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती, पाच तासांनी हे विमान रडारवरून अचानक गायब झाले. ते एका छोट्या गावात उतरले असून, वैमानिकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. (वृत्तसंस्था)

पोलिसांनी परिसर केला रिकामा
- तुपेलो शहरातील विमानतळावरून शनिवारी  एका अज्ञात व्यक्तीने विमान चोरून उडवले. त्यानंतर ते वॉलमार्ट स्टोअरवर धडकविण्याचा इशारा दिला.
- खबरदारीचा उपाय म्हणून वॉलमार्ट स्टोअर, तसेच परिसरातील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. तेथील लोकांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
- विमानाचे संकट टळेपर्यंत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले होते. विमान तुपेलो शहरावर बराच वेळ घिरट्या घालत होते.

का आखला कट?
वॉलमार्ट स्टोअरवरच विमान धडकविण्याचा कट आखण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पायलट कोण होता, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

 

Web Title: The of 9/11 in America again; Five hours of flight; A threat was given to blow up 'Walmart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.