विमान ३७ हजार फुटांवर होते, प्रवाशाला जोराचे जुलाब लागले...; पायलटने नाक दाबत विमान खाली उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 10:09 AM2023-09-05T10:09:13+5:302023-09-05T10:09:32+5:30
विमान खाली उतरल्यावर संपूर्ण विमानात घाण पसरली होती. ती साफ करण्यात आली. यानंतर डेल्टा एअरलाईनला दुसरे क्रू मेंबर शोधावे लागले होते.
खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड झाला तर विमाने माघारी परतल्याची किंवा इमरजन्सी लँडिंग केल्याच्या घटना घडत असतात. परंतू, एखादा व्यक्ती सारखा सारखा टॉयलेटला जाऊ लागला तर असे होऊ शकते का? नुकतेच एका विमान प्रवासात हे घडले आहे. डेल्टा फ्लाइटने शुक्रवारी रात्री जॉर्जियाच्या अटलांटा येथून दोन तास उशिराने उड्डाण केले आणि बार्सिलोना, स्पेनकडे निघाले.
विमान 37,000 फूट उंचीवर असताना एका व्यक्तीला तीव्र अतिसाराचा त्रास झाला. यामुळे पायलटला विमान परत नेण्यास भाग पडले. विमानात एवढी दुर्गंधी पसरली की प्रवाशांचा श्वासही घेता येईना. एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजनुसार प्रवाशाच्या पोटात गडबड झाली होती, यामुळे तो सारखा टॉयलेटला जात होता. यामुळे विमानात दुर्गंधी पसरली होती. अतिसारामुळे विमानातच त्याने अनेकदा टॉयलेट केले होते.
विमान खाली उतरल्यावर संपूर्ण विमानात घाण पसरली होती. ती साफ करण्यात आली. यानंतर डेल्टा एअरलाईनला दुसरे क्रू मेंबर शोधावे लागले होते. कारण त्यांची वेळ संपली होती. यानंतरच विमान पुढील प्रवासाला पाठविण्यात आले.
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याची दोन लहान मुले खेळत असल्याने विमानाचे लँडिंग अर्धा तास लांबविण्याचे पायलटला सांगितले होते. असे प्रकार नेहमी घडत असतात असे विमान प्रवाशांचे म्हणणे आहे.