कोरोनापेक्षाची भयंकर महामारी येण्याची शक्यता, अमेरिका-चीन-युरोपच्या लॅबमध्ये तयार होताहेत जीवघेणे व्हायरस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:22 PM2023-03-27T19:22:31+5:302023-03-27T19:23:25+5:30
गेल्या दोन वर्षांत जगभरात बायोलॅबच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर बायोलॅबच्या संख्येत ही तेजी दिसून आली आहे.
गेल्या दोन वर्षांत जगभरात बायोलॅबच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर बायोलॅबच्या संख्येत ही तेजी दिसून आली आहे. या बायोलॅबमध्ये धोकादायक विषाणू असतात. यामुळे धोकादायक जैविक शस्त्रास्त्रांची शर्यत होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. किंग्ज कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी जगभरातील अशा २७ प्रयोगशाळांची माहिती दिली आहे. त्यांनी लॅबमधून संभाव्य धोके व्यक्त करण्यात आले आहेत.
डॉ. फिलिपा लेंटझोस आणि डॉ. ग्रेगरी कोब्लांट्स यांनी याबाबतचा अहवाल दिला आहे. उच्च जोखमीच्या प्रयोगशाळांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. २०२१ पासून, अशा १० अगदी नवीन बायोसेक्युरिटी लॅब (BSL-4) एकतर चालू आहेत किंवा त्या बनवण्याचे काम चालू आहे. जगातील ६९ प्रयोगशाळांपैकी ज्या रोगजनकांवर काम करतात. त्यापैकी ५१ सुरू असून, आणखी १५ सुरू करण्याचे नियोजन आहे. यातील तिघांचे बांधकाम सध्या सुरू आहे.
कोरोना महामारीनंतर १२ लॅबची योजना उघड
वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूची गळती होऊ शकते का?, हा प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे. दुसरीकडे, कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर ९ देशांनी १२ नवीन BSL-4 लॅब तयार करण्याच्या योजनेची माहिती दिली आहे. जैवसुरक्षा तज्ज्ञ डॉ. रिचर्ड एब्राइट म्हणाले की, २००२ पासून अमेरिकेतील उच्च-जोखमीच्या प्रयोगशाळांच्या वाढीमुळे 'BSL-4' क्षमतेतील प्राणघातक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झाली आहे.
अमेरिकेने सुरू केली धोकादायक शस्त्रांची शर्यत
द सन ऑनलाइनच्या वृत्तानुसार, अमेरिकेने सुरू केलेली प्राणघातक आंतरराष्ट्रीय शस्त्र शर्यत, नंतर चीन आणि रशियानेही त्यात भाग घेतला आहे. आता जगभरात ही स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. डॉ. फिलिपा लेंटझोस आणि डॉ. ग्रेगरी कोब्लंट्स यांनी सावध केलं की प्रयोगशाळांमुळे उद्भवलेल्या मोठ्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके पूर्णपणे पुरेशी नाहीत. बहुतेक देश उच्च जोखमीच्या प्रयोगशाळा बांधत आहेत.
जगात किती प्रयोगशाळा आहेत?
किंग्ज कॉलेज लंडनच्या अहवालात बीएसएल-4 प्रयोगशाळा युरोपमध्ये सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. युरोपमध्ये 26 BSL-4 प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी एक यूकेमध्ये बांधली जात आहे आणि एक स्पेनमध्ये बांधली जाण्याची शक्यता आहे. आशियामध्ये अशा २० प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी ११ चीन, भारत, कझाकस्तान, तैवान, फिलीपिन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि जपानमध्ये बांधण्याची योजना आहे. उत्तर अमेरिकेत १५ बायोलॅब आहेत, एक यूएसमध्ये आणि दोन कॅनडामध्ये बांधकामाधीन आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ४ उच्च-जोखीम प्रयोगशाळा आहेत. ज्या सध्याच्या घडीला सुरू आहेत.
BSL-4 लॅबमध्ये धोकादायक विषाणू
BSL-4 लॅब्स संभाव्य विनाशकारी व्हायरससह कार्य करण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत. अशा प्रयोगशाळांमध्ये इबोला, निपाह सारखे विषाणू असू शकतात. यामध्ये कोविडपेक्षाही जास्त प्राणघातक ठरण्याची क्षमता आहे. अहवालात असेही म्हटले आहे की २० सर्वात धोकादायक प्रयोगशाळांपैकी ११ नियोजित किंवा बांधल्या जात आहेत या एकट्या आशियातील आहेत.